जय जय राम कृष्ण हरीच्या नादघोषात रंगली मुलांची आनंदवारी
कणकवली | मयुर ठाकूर : अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्था मुंबईच्या बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल च्या विद्यार्थ्यांनी रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल असा नाद करीत आपला वारकरी मेळा भालचंद्र बाबाच्या चरणी वंदीत केला.
बालशिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतींने भालचंद्र मठ येथे आषाढी एकादशीचा कार्यक्रम संपन्न झाला. मुलांना आपल्या संत कलेचा वारसा समजावा, तसेच आपल्या संस्कृतीचे ज्ञान मिळावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विद्यार्थी वर्गाने रखुमाई, खेळ मांडीयाला यासारख्या गाण्यांनी आणि अभगांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. उंन्नती गोडे हिच्या विठ्ठला तू या अभंगाने सर्वांना विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन केले. आषाढी एकादशी विषयी सान्वी वाघाटे, मिथिलेश तळवडेकर यांनी उत्तम रित्या विचार मांडले. छोट्याश्या आदित्य दळवी या चिमुकल्याच्या कीर्तनाने सर्वांचे लक्ष वेधलं. विद्यार्थीनींनी माऊली माऊली या वर नृत्य सादर करून भाविक भक्तांना विठ्ठलच्या नामघोषात ठेका ठरायला भाग पाडले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे संस्थापक सुलेखा राणे आणि रमेश राणे सर, संस्था संचालक संदीप सावंत, मुख्याध्यापिका अनघा राणे, सांस्कृतिक विभाग प्रमुख अन्वी गवाणकर, जिष्णा नायर, संगीत शिक्षक श्याम तेंडुलकर, तबला शिक्षक श्रीपाद बाणे, नृत्यशिक्षक मानसी बेलवलकर,आनंद मेस्त्री, अश्विनी जाधव तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन शाळेच्या विद्यार्थीनी कुमारी ज्ञानपरी ठोंबरे व कनिष्का राणे यांनी उत्तमरित्या पार पाडले.