11.3 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

कणकवली येथील नष्टे मेडिकलचे मालक अजित नष्टे यांचे निधन

सोमवारी कणकवलीत करणार अंत्यसंस्कार

कणकवली : बाजारपेठ मधील रहिवासी व कणकवलीतील नष्टे मेडिकलचे मालक अजित रमेश नष्टे ( वय ४२ ) यांचे रविवारी मुंबई येथील केईएम रुग्णालयात उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. कणकवलीत नष्टे मेडिकल चा त्यांचा व्यवसाय होता. गेले काही दिवस ते आजारी होते. मुबंई येथील केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना सोमवारी (उद्या) डिस्चार्ज देणार होते. या दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले.

त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण, असा परिवार आहे. त्यांचा मृतदेह सोमवारी (उद्या) कणकवलीत आणणार असून, त्यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कणकवली शहरात त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे. हसतमुख स्वभावामुळे त्यांचे अनेकांशी स्नेहाचे सबंध होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!