1.2 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

संदेश पारकर यांनी कै. सुबोध टिकले यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिरातून जोपासली सामाजिक बांधिलकी…

संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त १०२ रक्तदात्यांनी केलं रक्तदान

कणकवली | मयुर ठाकूर : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त भगवती मंगल कार्यालयात येथे कै. सुबोध टिकले यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर घेत रक्तदान शिबिराचा संकल्प कायम ठेवला आहे. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीबद्दल समाजात कौतुक होत आहे. या शिबिराचा शुभारंभ माजी खास. विनायक राऊत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला. या शिबिरात १०२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

युवक युवतींनी या रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी संदेशप्रेमींनी विशेष मेहनत घेतली. या शिबिरात रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचे तसेच यशस्वी करणाऱ्या सर्वांचे संदेश पारकर यांनी आभार व्यक्त केले. गेली अनेक वर्षे संदेश पारकर यांच्या पुढाकारातून त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्त संकलीत केले जाते. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय येथील रक्तपेढीव्दारे रक्त संकलन करण्यात येते. या शिबिरातून संकलीत होणाऱ्या रक्ताचा अनेक रुग्णांना फायदा होत असतो.

यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर, शिवसेना विधानसभा प्रमुख सतीश सावंत, विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, आपचे जिल्हाप्रमुख विवेक ताम्हणकर, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, माजी नगरसेवक रुपेश नार्वेकर, अवधूत मालणकर, राजू राठोड, सुयोग टिकले आदित्य सापळे, वैभव मालांडकर राजू रावराणे विलास गुडेकर, धीरज मिस्त्री, तेजस राणे ईशान शेख, बाबू जाधव, आबु मेस्त्री आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!