-1.8 C
New York
Tuesday, March 3, 2026

Buy now

उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधीक्षकांनी केला कणकवली पोलीस ठाण्याच्या या अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव….

कणकवली | मयुर ठाकूर : मे २०२४ मध्ये विविध गुन्ह्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जिल्ह्यातील ३४ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुक्रवारी प्रशंसापत्र प्रदान करून जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यामध्ये कणकवली पोलीस ठाण्याच्या एकूण पंधरा पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

यामध्ये कणकवली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक समशेर तडवी, महिला पोलिस उपनिरीक्षक वृषाली वरगे, पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ, रवींद्र शेडगे, हेड कॉन्स्टेबल पांडुरंग पांढरे, विनोद चव्हाण, महिला पोलिस कॉन्स्टेबल प्रणाली जाधव, पोलिस नाईक रुपेश गुरव, उद्धव साबळे, कॉन्स्टेबल यू बो. कदम, नितीन बनसोडे, महेश फाळके, भूषण सुतार, मनीष पावरा, पांडूरंग कळंत्रे यांचा समावेश आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!