23.5 C
New York
Sunday, July 13, 2025

Buy now

…तर त्या गोष्टीचा मला आनंद आहे | काय म्हणाले माजी खा. निलेश राणे वाचा…

सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : माजी खासदार डॉक्टर निलेश राणे यांनी केलेल्या एका पोस्टमध्ये आमदार वैभव नाईक यांना टोला लगावला आहे. त्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, मला विधानसभेची तिकीट मिळणार की नाही ? याचं टेन्शन वैभव नाईक यांना जास्त आलेलं दिसत आहे. रोज उठून माझा सोशल मीडिया अनेक कामाचा पाठला करणे, दोन-तीन पक्षातले टुकार लोकांना माझ्यावरती टीका करण्यासाठी पगारावर ठेवणे, याचाच अर्थ वैभव नाईक मला घाबरले, असे मी म्हणणार नाही. पण ती भीती ते त्यांच्या कृती मधून दाखवत आहेत, अशी टीका माजी खासदार डॉक्टर निलेश राणे यांनी आमदार वैभव नाईक यांच्यावर केली आहे.

तसेच ते पुढे म्हणालेत, मी कुडाळ – मालवण मतदार संघाचे काम एका आमदाराने कसं करावं हे त्यांना दाखवत आहे. त्याच्यातून ते जर काही शिकत असतील, तर मला त्या गोष्टीचा आनंद आहे, असा उपरोधित टोला देखील माजी खासदार डॉक्टर निलेश राणे यांनी आ. वैभव नाईक यांना लगावला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!