4.2 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

आयुष्य आपल्याला एकदाच मिळते हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे : पोलीस निरीक्षक समशेर तडवी

कणकवली कॉलेजमध्ये अंमलीपदार्थ जनजागृती मोहिम संपन्न

कणकवली | मयुर ठाकूर : आई-वडिलांनी आपल्याला अनेक स्वप्न पाहून लहानाचे मोठे केले आहे. आपण जे करू शकलो नाही, ते आपल्या मुलांनी केले पाहिजे. या आशेने लहानाचे मोठे करून उच्च शिक्षणापर्यंत आपल्याला आणलेले आहे. त्यामुळेच आयुष्य आपल्याला एकदाच मिळते हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे,असे प्रतिपादन कणकवली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक समशेर तडवी यांनी कणकवली कॉलेज येथे आयोजित अंमलीपदार्थ विरोधी जनजागृती मोहिमेत केले. यावेळी ‘ही दोस्ती तुटायची नाय’ हे रंगखांब ग्रृप कणकवलीचे पथनाट्य सादर करण्यात आले.

यावेळी कणकवली पोलिस निरीक्षक समशेर तडवी, पोलिस उपनिरीक्षक बापू खरात, पोलिस हवालदार राजेंद्र नानचे, श्री. मोहिते, पो.कॉ. रूपेश गुरव, भूषण सुतार, किरण कदम, राज आघाव, किरण मेथे, राजेश उबाळे, वाहतुक पोलिस हवालदार विनोद चव्हाण, कणकवली कॉलेजचे प्राचार्य युवराज महालिंगे, मंगेश चौहाण यांच्यासह कणकवली महाविद्यालयातील १५० विद्यार्थी व विद्यार्थींनी सदरच्या अंमलीपदार्थ विरोधी जनजागृती मोहिमेत सहभाग दर्शविला.

सदरच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अंमलीपदार्थ सेवन केल्यानंतर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत पोलिस निरीक्षक श्री.तडवी यांनी मार्गदर्शन केले. तसेच रंगखांब ग्रृप कणकवली यांचे पथनाट्य सादर करून व्यसनांचा आपल्या कुटुंबावर व आपल्या शरिरावर काय परिणाम होऊ शकतो याचे प्रात्यक्षिक पथनाट्याच्या माध्यमातून दाखविण्यात आले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!