22.3 C
New York
Monday, July 22, 2024

Buy now

आमदार नितेश राणे यांची संकल्पना | वैभववाडीतील शेकडो महिला देवदर्शनासाठी रवाना

वैभववाडी : पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, चा जयघोष करत वैभववाडी तालुक्यातून महिला देवदर्शनासाठी रवाना झाल्या आहेत. कार्यसम्राट आमदार नीतेश राणे यांच्या संकल्पनेतून पंढरपूर , अक्कलकोट यात्रेकरिता वैभववाडी तालुक्यातून १५० महीला रवाना झाल्या आहेत. यात वयोवृद्ध महिलांचा देखील समावेश आहे. आमदारांनी आमची देवदर्शनाची इच्छा पूर्ण केली अशा बोलक्या प्रतिक्रिया याप्रसंगी वयोवृद्ध महीलांनी दिल्या. यात्रेतील सर्व महींलाना मोफत सुविधा आ. नितेश राणे यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. या यात्रेचा शुभारंभ माजी सभापती अरविंद रावराणे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या यात्रेत कोकिसरे जि. प. मतदार संघातील महिलांचा समावेश आहे.

श्री बाळूमामा आदमापुर, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट आणि श्री विठ्ठल रखुमाई पंढरपूर दर्शन या ठिकाणी सर्व महिला देवदर्शन करणार आहेत. शुभारंभ प्रसंगी माजी जि. प. सदस्य सुधीर नकाशे, नगराध्यक्ष नेहा माईणकर, तालुका सोशल मिडियाप्रमुख बाबा कोकाटे, महिला तालुकाध्यक्ष प्राची तावडे, माजी सभापती स्नेहलता चोरगे , शक्तिप्रमुख प्रकाश सावंत, श्री. बंदरकर, धाकू पाटील, प्रदीप जैतापकर, दाजी कोलते, राजेश सरवणकर, व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!