8 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

त्यामुळे “त्‍यांनी” आम्‍हाला आव्हान देण्याची भाषा बोलू नये – सुशांत नाईक

पैसे वाटणारे कार्यकर्ते हीच राणे समर्थकांची ओळख

कणकवली | ठाकूर : प्रत्‍येक निवडणुकीत मतदारांसह आपल्‍या घरातल्या कार्यकर्त्यांनाही मतांसाठी पैसे वाटणाऱ्यांनी आम्‍हाला निवडणुकीत आव्हान देण्याची भाषा बाेलू नये. सामाजिक कार्याच्या पाठबळावर तुम्‍ही आव्हान दिले तर ते जरूर स्वीकारू असे प्रतिआव्हान युवासेना जिल्‍हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आज दिले. तसेच पैसे वाटणारे कार्यकर्ते हीच राणे समर्थकांची ओळख निर्माण झाल्‍याचा टोलाही त्‍यांनी लगावला. येथील विजयभवन येथे श्री. नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, युवासेनेचे तालुकाप्रमुख उत्तम लोके, तालुका समन्वयक तेजस राणे, उपस्थित होते. कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आणि उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन आमदार वैभव नाईक आणि युवासेना जिल्‍हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यावर टीका केली होती. त्‍याला आज सुशांत नाईक यांनी प्रत्‍युत्तर दिले. श्री. नाईक म्‍हणाले, नलावडे यांनी आमदार श्री.नाईक यांच्यावर टीका केली. कुडाळ मतदारसंघातून ते पुन्हा निवडून येणार नाहीत. त्‍यामुळे चार महिने आमदारकी एन्जॉय करावी असेही नलावडे आणि हर्णे म्‍हणाले होते. मात्र शहरात व्यावसायिक राजकारण करून नलावडे, हर्णे हेच राजकारण एन्जॉय करत आहेत. तर विधानसभा निवडणुकीत राज्‍यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. त्‍यामुळे कुडाळ मतदारसंघातून आमदार वैभव नाईक यांचा विजय निश्‍चित आहे. एवढेच नव्हे तर नव्या सरकारमध्ये ते निश्‍चितपणे सिंधुदुर्गचे पालकमंत्री असतील. नाईक म्‍हणाले, राज्‍यात सत्ता बदल झाला की नलावडे आणि हर्णे यांची निष्‍ठा बदलते. त्‍यामुळे चार पाच महिन्यानंतर विधानसभा निवडणुकांचे निकाल येतील तेव्हा या दोहोंच्याही निष्ठा बदललेल्‍या असतील. नलावडे आणि हर्णे हे शहरात झालेल्‍या विकासकामांमुळे राणेंचा विजय झाले असल्‍याचे सांगतात. जर तुम्‍ही विकासकामे केली तर प्रत्‍येक निवडणुकांत मतदारांना पैसे का वाटता असा सवालही श्री. नाईक यांनी केला. गेली ३५ वर्षे नारायण राणेंनी विविध पदे भूषवली आहेत. या पदांचा वापर त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी केला असता तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राणे समर्थकांना मतदारांना पैसे वाटण्याची वेळ आली नसती. राणेंनी ही निवडणूक धनशक्तीच्या जोरावर जिंकली आहे, असा गंभीर आरोप नाईकांनी केला. माजी खासदार विनायक राऊत १५ जूनला सिंधुदुर्ग दौर्‍यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते ठिकठिकाणी जाऊन जनतेचे व मतदारांचे आभार मानणार आहेत. राऊत हे जिल्ह्यात पुन्हा एकदा शिवसेना उबाठा गटाची संघटनात्मक बांधणी करून राणेंच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी शिवसैनिकांना चार्ज करणार आहेत. राऊत हे लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावर चिंतन करणार आहेत. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार निवडून येण्यासाठी पदाधिकारी व शिवसैनिकांच्या बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहेत, असे पारकर यांनी सांगितले.‌ जिथे सत्ता तिथे उडी मारणे आणि सत्तेतून पैसे कमविणे हे नलावडे व हर्णे यांचे धोरण आहे. नलावडे व हर्णे यांनी शहरात व्यावसायिक राजकारण करून स्वतःचा विकास केला आहे असाह आरोप श्री. नाईक यांनी केला

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!