22.3 C
New York
Monday, July 22, 2024

Buy now

कुडाळातील “त्या” अतिक्रमणाच्या विरोधात १७ ही नगरसेवक एकत्र

मनसेच्या तक्रारीनंतर दखल ; धीरज परबांनी मानले आभार ; एकजूटीचे कौतूक

कुडाळ : येथील संत राऊळ महाराज कॉलेज सर्कल नाला परिसरात एका बिल्डरकडुन झालेले अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे, अशी मागणी कुडाळातील सत्ताधारी व विरोधी गटाच्या सतराच्या १७ नगरसेवकांनी केली आहे. अतिक्रमणा सारख्या महत्वाच्या प्रश्नावर सर्वजण एकत्र आल्यामुळे मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी सर्वांचे आभार मानले आहे. हे अतिक्रमण काढून टाकण्यात यावे, अशी मागणी मनसेच्या माध्यमातून करण्यात आली होती. त्या कामाला विरोध दर्शवून सर्वांनी आपली एकजूट दाखवून दिली आहे.  कुडाळ शहरातील संत राऊळ महाराज कॉलेज चौकातील नाल्यावर दोघा बिल्डरांकडून झालेल्या अतिक्रमणामुळे, चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साठून शाळा कॉलेजचे विद्यार्थी, महिला रुग्णालयाकडे जाणारे रुग्ण, तसेच स्थानिक व्यावसायिक व नागरिक यांना त्रास होत होता. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत आवाज उठविल्यानंतर सुरुवातीच्याच दोन तासांच्या पावसामुळे कॉलेज चौकात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले. यामुळे गैरसोय झालेल्या नागरिकांनी तसेच मनसैनिकांनी स्थानिक नगरसेवकांकडे याचा रोष व्यक्त केला. तसेच मोठ्या प्रमाणावरती सोशल मिडीयातुन कुडाळ नगरपंचायतच्या विरोधात पोस्ट व व्हिडिओ व्हायरल झाले होते. याची दखल घेत कुडाळ नगरपंचायतच्या सत्ताधारी आणि विरोधी अशा सतराही ही नगरसेवकांनी त्या ठिकाणी नाला, ओहोळाचे रुपांतर लहान काँक्रीटच्या गटारात बांधकाम करून, अतिक्रमण करणाऱ्या बिल्डरांना नगरपंचायत प्रशासनामार्फत दिलेली बांधकाम पूर्व परवानगी रद्द करणे व चुकीच्या पद्धतीने झालेले बांधकाम तोडून टाकणेसाठी पत्र दिले आहे. याला या नगरसेवकांनी सुद्धा दुजोरा दिला आहे. इतर वेळी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणारे सत्ताधारी व विरोधी पक्षाचे नगरसेवक यावेळी मात्र जनतेच्या प्रश्नावर एकत्र आल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांचे आभार मानले. याबाबत मनसे कडुन संबंधित नाला, ओहोळ रूंद करुन मिळावा याचा पाठपुरावा नगरपंचायतकडे सुरु असल्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी सांगितले. या सर्व घडामोडींवर नगरपंचायत प्रशासन तसेच मुख्याधिकारी काय भूमिका घेणार? यावर आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!