8 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

सिंधुदुर्गातील सात सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पदोन्नतीचे आदेश

सिंधुदुर्ग : राज्य शासनाने पोलीस दलात कार्यरत असलेल्या ४४७ सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना पोलीस निरीक्षक या पदावर पदोन्नतीचे आदेश काढले आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सात सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. राज्य शासनाने पदोन्नतीने पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती दिलेल्या अधिकाऱ्यांमध्ये बांदा येथे कार्यरत असलेले विकास बडवे यांचा समावेश असून त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा देण्यात आला आहे. आचरा येथे कार्यरत असलेल्या सुनील जाधव यांना कोकण विभागातील राज्य गुन्हा विभागात नियुक्ती देण्यात आली आहे. विजयदुर्ग येथे कार्यरत असलेल्या मनोज सोनवलकर यांनाही सिंधुदुर्ग देण्यात आला आहे. कणकवली येथे कार्यरत असलेल्या मनोज पाटील यांना मुंबई शहर देण्यात आले आहे. निवती येथे कार्यरत असलेल्या जयेश ठाकूर यांना पुणे महसूल विभागातील गुन्हा अन्वेषण विभाग देण्यात आला आहे. वेंगुर्ले येथे कार्यरत असलेल्या प्रशांत जाधव यांना मुंबई शहर देण्यात आले आहे. सावंतवाडी येथे कार्यरत असलेले श्रीकांत इंगवले यांची मुंबई शहर येथे पदोन्नतीने बदली मिळाली आहे. पदोन्नती मिळालेल्या ६ पैकी ४ अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली झाली आहे. तर ३ अधिकाऱ्यांना सिंधुदुर्गच देण्यात आला आहे

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!