8.8 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

….म्हणून मालवणातील मताधिक्य घटले | महेश कांदळगावकरांची शिवसेनेला सोडचिठ्ठी

सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : आमदार वैभव नाईक व माजी खासदार विनायक राऊत यांनी जनहिताच्या प्रश्नांच्या अनुषंगाने मालवण नगरपरिषेच्या प्रशासकीय कारभाराबाबत मवाळ धोरण स्वीकारले. शहरातील प्रश्नांबाबत आमदार, खासदार यांच्याकडे त्यांच्याच पक्षाचा माजी नगरध्यक्ष म्हणून गेली दोन वर्षे सातत्याने आपण भूमिका मांडूनही त्याकडे दुर्लक्ष झाले. यामुळेच लोकसभा निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मालवण शहरातील मताधिक्य घटले, अशी टीका मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदाळगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे करत आम. नाईक व माजी खासदार विनायक राऊत यांना घरचा आहेर दिला आहे. तसेच मालवण नगरपालिकेतील प्रशासक यांच्या विकास कामावरील दुर्लक्षाबाबत खासदार नारायण राणे यांची भेट घेणार असल्याचेही कांदळगावकर यांनी स्पष्ट केले आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेत भाजपला मताधिक्य मिळाले. तर मालवण शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मताधिक्यामध्ये मोठी पीछेहाट झाली. शहरात सुमारे १२०० मते ठाकरे शिवसेनेला कामी पडली. जनहिताच्या अनेक प्रश्नाकडे झालेले दुर्लक्ष यास कारणीभूत आहे. मालवण नगरपालिकेत दोन वर्षातील मनमानी पद्धतीने सुरू असलेला प्रशासकाचा कारभार आणि त्यावर विद्यमान आमदार, खासदार यांचा नसलेला अंकुश हे देखील कारणीभूत ठरलेले आहे. मागील दोन वर्षापासून माजी नगराध्यक्ष म्हणून मालवणच्या विकास कामाबाबत, स्वच्छतेबाबत काम होत नसल्याचे जाहीर निवेदन करुनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने ही परिस्तिथी निर्माण झाली आहे, असे महेश कांदळगावकर यांनी म्हटले आहे.

आमचा लोकप्रतिनिधी कालावधी डिसेंबर २०२१ ला संपल्यानंतर मालवण नगरपालिकेत प्रशासकीय कालावधी सुरु झाला. लोकप्रतिनिधी यांचा कालावधी संपून प्रशासकीय कालावधीला जवळपास अडीज वर्ष पूर्ण होत असताना आमच्या काळात सुरु झालेली कामे अजूनही काम पूर्ण झालेली नाहीत. यामध्ये सुसज्ज असे भाजी मार्केटचे काम अद्यापही काम अपूर्ण आहे. नगरपालिकेच्या सफाई कर्मचारी यांच्यासाठी सुरु असलेल्या इमारतीचे काम अद्यापही संथ गतीने सुरू आहे. नगरपरिषद आवारातील अग्निशमन बिल्डिग, मामा वरेरकर या ठिकाणचा वातानुकूलित मल्टिपर्पज हॉलचे काम पूर्ण झालेले नाही. शहरातील स्वच्छता ही फक्त इव्हेंटपुरती मर्यादित राहिली आहे. डास प्रतिबंधक फवारणी बंद करण्यात आली आहे. मालवण नगरपरिषदेच्या मालकीच्या सार्वजनिक विहिरींमधील पाणी शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया बंद आहे. कचऱ्या पासून खत निर्मितीच्या लाखो रुपयांच्या मशिन मागील दोन वर्षापासून बंद आहेत. स्वच्छतेच्या नावाखाली जवळपास ३० लाख किमतीचा जेसीबी धूळ खात उभा आहे, अश्या प्रकारे मालवणच्या जनतेच्या आरोग्याशीही खेळ सुरु आहे, अशी टीका महेश कांदळगावकर यांनी केली आहे.

फोवकांडा पिंपळ याठिकाणी असलेला रंगीत कारंजा गेले दीड वर्ष बंद आहे. फिश मार्केट इमारत वरच्या मजल्यावरील मच्छीमार बांधवाना गृहीत धरून बांधलेले गाळे आज भाडे ठरविले नसल्याने मागील अडीज वर्षापासून बंद पडून आहेत. मालवणची नळपाणी योजना, भुयारी गटर योजना या होण्यासाठी आमच्या कालावधी सातत्याने प्रयत्न करत होतो. पण मागील अडीज वर्षामध्ये बिल काढण्यापलीकडे कुठलही काम याबाबत झाल नाही. मालवण शहराच्या प्रलंबित विकासकामाबद्दल, स्वच्छतेबद्दल, चुकीच्या धोरणामुळे होत असलेल्या आर्थिक नुकसानीबद्दल मागील दोन वर्ष सातत्याने आवाज उठवूनही प्रशासकाने याबाबत कुठलीही बाब गांभीर्याने घेतली नाही. याबाबत त्यांना विद्यमान आमदार, खासदार यांच्याकडून हवी तशी समज देण्यात आली नाही, असेही श्री. कांदळगावकर यांनी म्हटले आहे.

आमदार याना सातत्याने खोटी आश्वासन देण्यात आली. असे असताना प्रशासका विरुद्ध आयुक्तांकडे तक्रार करणे आवश्यक असताना मवाळ धोरणाचा त्रास मालवणच्या जनतेला झाला. मालवण शहराची विकास कामे ठप्प झाली. नगरपालिकेचे लाखो रूपयाचे आर्थिक नुकसान झाले, शासकीय निधीचा अपव्यय झाला, लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आणि हा सगळा रोष मालवणच्या जनतेने मताच्या रूपाने दाखवून दिला आहे, अशी टिकाही श्री. कांदळगावकर यांनी केली आहे. मालवणच्या प्रलंबित विकास कामाबाबत आणि न. प. प्रशासकाच्या मनमानी कारभाराबाबत खासदार नारायण राणे यांची भेट घेवून त्यांना या बाबतचे निवेदन देवून या कामाबाबत पुढील आदेश संबंधित यंत्रणेला द्यावे, अशी विनंती करणार असल्याचेही कांदाळगावकर यांनी म्हटले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!