कणकवली ( मयुर ठाकूर ) : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून जिल्हा रुग्णालय ओरोस येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. श्याम पाटील, यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. चिपळूणकर, डॉ. चुबे, डॉ. समीर धाकोरकर, डॉ. सुबोध इंगळे यांनी या आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊन मार्गदर्शन केले.
यावेळी तंबाखू नियंत्रण कक्षाच्यावतीने तंबाखूचे दुष्परिणाम दर्शविणाऱ्या, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मंडळाच्यावतीने तंबाखू नियंत्रण विभागागाच्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘भारतीय संविधान कलम ४७’ ची प्रत देऊन सत्कार करण्यात आला. नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत व तंबाखूपासून दूर राहण्यासाठी असणाऱ्या सर्व उपाययोजना सांगितल्या. यावेळी सर्वांना तंबाखू मुक्तीची शपथ दिली. तसेच तंबाखू नियंत्रण विभागाचे सामाजिक कार्यकर्ते श्री. अल्मेडा यांनी ही तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप मोहोड यांनी केले तर आभार प्रदर्शन सिस्टर तृप्ती जाधव यांनी मानले.
मयुर ठाकूर | संपादक