21.2 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

कणकवली शहरात मोठी वाहतूक कोंडी ; पोलिसांचे दुर्लक्ष

कणकवली | मयुर ठाकूर : एप्रिल महिना संपल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात चाकरमानी वर्ग दाखल झाला आहे. त्यातच पुन्हा लोकसभा निवडणूक २०२४ चे रत्नागिरी – सिंधुदुर्ग साठीचे मतदान ७ मे २०२४ रोजी होणार आहे. अशातच कणकवली ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. त्यामुळे या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र असे असले तरी पोलीस मात्र सुशेगातच असल्याचे चित्र आहे. कारण कणकवली बस स्थानक ते जाणवली गड नदी पूल व जाणवली गड नदी पूल ते नरडवे नाका दरम्यान सर्व्हिस रस्त्याच्या बाजूला रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहन पार्किंग करून ठेवलेली दिसून येत आहेत.

त्यामुळे सध्या कणकवली शहरात मोठी वाहतूक कोंडी होत आहे. अशातच वाहतुल पोलीस देखील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कोणतीही दखल घेताना दिसत नाहीत. एकंदरीत जर पाहिलं तर कणकवलीतील वाहतुल कोंडी मुले वाहनचालकांमधून तीव्र नाराजी उमटू लागली आहे. वृद्ध पादचाऱ्यांना देखील या वाहतूक कोंडीचा मोठा त्रास होत असून कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शहरातील बेशिस्त वाहन पार्किंग आणि सर्व्हिस रस्त्यावर उभी करून ठेवण्यात आलेल्या वाहनांवर नेमकी कारवाई काय करणार की उपविभागीय पोलीस अधिक्षक यांना याकडे लक्ष देण्याची वेळ येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

वाहतूक पोलीस गेले कुठे…

कणकवली शहरात पटवर्धन चौकात कणकवली पोलीस ठाण्याचे दोन पोलीस हवालदार वाहतूक पोलीस म्हणून कार्यरत आहेत. मात्र वाहतुक कोंडी वेळीच ते पोलीस कुठे दिसत नाहीत. अशात रुग्णवाहिका देखील काही वेळा अडकून पडलेल्या पाहायला मिळतात.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!