4.6 C
New York
Saturday, March 14, 2026

Buy now

भेडशीत एकाचा खून | संशंयित ताब्यात, चौकशी सुरू

लाकडी फळीने वार केल्यामुळे मृत्यू

दोडामार्ग : किरकोळ कारणावरून झालेल्या झटापटीत लाकडी फळीने डोक्यावर वार केल्यामुळे साटेली-भेडशी येथील बाजारपेठे एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. अमर मनोहर देशमाने (वय ५०, रा. कोयनानगर-सातारा) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले असून चौकशी सुरू आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, साटेली-भेडशी येथील वामन संकुल या इमारतीच्या मधल्या पॅसेज मध्ये अज्ञात व्यक्तीने वार केल्यामुळे अमर याचा मृत्यू झाल्याचा प्रकार आज सकाळी उघड झाला. याबाबतची माहिती तेथील व्यावसायिक व ग्रामस्थांनी कळविल्यानंतर पोलीस पाटील प्रकाश देसाई यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आज सायंकाळी उशिरा एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे. याबाबतची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांनी दिली.

दरम्यान हा प्रकार वादातून घडल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दोघेही कामगार असून ते छोटी-मोठी कामं करत होते. त्या कामाच्या देवघेवीवरून ही घटना घडली असावी, असा पोलिसांना अंदाज आहे. या दृष्टीने पोलीस संबंधित संशंयिताकडे तपास करीत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!