नुकसानग्रस्त कुटुंबांना सिमेंट पत्रे केले घरपोच
वादळी वाऱ्यात हळवल येथील ४० घरांचे झाले होते नुकसान
कणकवली | मयुर ठाकूर : तालुक्यातील हळवल गावातील एकूण ४० घरांचे वादळी वाऱ्यात नुकसान झाले. नुकसानग्रस्त झालेल्या कुटुंबियांच्या मदतीसाठी भाजप आमदार नितेश राणे धावून गेले. या ठिकाणच्या ४० घरांचे छत, छताचे पत्रे वाऱ्याने उडून गेली होती. तर काहींच्या घरावर झाडे पडून नुकसान झाले होते. या सर्वांना मदतीचा हात म्हणून सिमेंट पत्रे आमदार नितेश राणे यांनी तातडीची मदत म्हणून घरपोच केली.
यावेळी तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष आण्णा कोदे, सोशल मीडिया प्रमुख समीर प्रभुगावकर, उपसरपंच श्री. राणे, शशिकांत राणे, मनोहर परब, विजय परब, लवू परब, दशरथ परब, वामन परब, सतीश चव्हाण, लक्ष्मण ( प्रदीप ) गावडे, मंगेश परब, मनोहर परब मधुकर पाडावे, अरुण राऊळ, नितीन परब आदी उपस्थित होते.
गुरुवारी झालेल्या वादळी पावसाने हळवल येथील ४० घरांचे साधारपणे १८ लाखांचे नुकसान झाले आहे. मात्र यामध्ये बहुतांश घरांवर झाडे पडल्याने घरांची छप्परे मोठ्या प्रमाणात उध्वस्त झाली होती. याबाबत प्रशासनाने तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामे केले. यावेळी नुकसानग्रस्तांनी आमदार नितेश राणे यांचे आभार मानले.