कणकवली : सध्या वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. काही वेळा उन्हाचा कडाका वाढलेला असतो, तर काहीवेळा ढगाळ वातावरण असते. या संमिश्र वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
कधी अतिउष्ण तर कधी ढगाळ वातावरण निर्माण होते. यामुळे ताप, डोकेदुखी तसेच अन्य आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अतिउष्णतेमुळे पाणी भरपूर प्या फळांचे सेवन, दुपारच्यावेळी बाहेर जाणे टाळले पाहिजे यांसारख्या उपाययोजना करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडूनही करण्यात आले आहे.