9.7 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

नारायण राणे यांना सर्वाधिक मताधिक्य सावंतवाडी मतदारसंघातून आवश्यक – मंत्री दीपक केसरकर

वेंगुर्ले: पर्यटनाच्या दृष्टीने पुढे येणारा काळ हा वेंगुर्ले तालुक्याचा असणार आहे. वेंगुर्ल्यात ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचे स्मारक बॅरिस्टर नाथ पै यांचे स्मारक उभे राहिले आहे. तुमचा आर्थिक विकास झाल्याशिवाय समाज सुखी होणार नाही आणि म्हणून ही निवडणूक विकासाची लढाई आहे. कोणत्याही परिस्थितीत ही लढाई आपल्याला जिंकायलाच लागेल. आणि ज्यावेळी ती जिंकू त्यामध्ये सावंतवाडी मतदार संघाचे मताधिक्य हे सर्वात जास्त असले पाहिजे. नारायण राणे यांना सुद्धा वाटलं पाहिजे की या मतदारसंघातील लोकांनी आपल्याला प्रेम दिलेल आहे आणि मंत्री म्हणून निधी देताना सुद्धा ज्यादा चा निधी हा आपल्या मतदार संघाला मिळायला पाहिजे. शिवसेनेची युती ही बाळासाहेबांनी तयार केलेली आहे. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये युतीचे चिन्ह हे कमळ आहे जे गैरसमज करून देतात त्याचे जाहीर उत्तर मी वेंगुर्ल्याच्या माणिक चौकात जाहीर सभा घेऊन देणार असल्याचा इशारा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी वेंगुर्ले येथे बोलताना दिला.

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार भाजपचे नेते तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ शालेय शिक्षण मंत्री यांनी वेंगुर्ले मंगळवारी ३० एप्रिल रोजी शहरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गाटीभेटी घेतल्या. यावेळी केसरकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

सर्वप्रथम शहरातही श्री वेतोबा च्या वाढदिवसानिमित्त मंत्री दीपक केसरकर यांनी मंदिर ला भेट देत श्री वेतोबाचे दर्शन घेतले. यानंतर वेंगुर्ले वडखोल येथील प्रभाकर पडते यांच्या निवासस्थानी, सातेरी मंदिर येथील सुशील सुधाकर परब यांच्या निवासस्थानी व नंतर दाभोसवाडा येथील बाबी रेडकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य दिलीप गिरप, शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, जिल्हा संघटक सुनील डूबळे, शहर प्रमुख उमेश येरम, भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, भाजप युवमोर्चा तालुकाप्रमुख प्रणव वायंगणकर आदी उपस्थित होते

पुढे बोलताना दीपक केसरकर म्हणाले, प्रगतीच्या दिशेने वेंगुर्ला तालुका वाटचाल करत आहे. झुलत्या पुलामुळे नवाबाग समुद्रकिनाऱ्यावर सुट्टीच्या दिवशी प्रचंड गर्दी असते. ताज प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार आहे. आरवली येथील पंचतारांकित हॉटेल सुद्धा पुढील दोन महिन्यात सुरू होणार आहे. तिलारीच पाणी २०० कोटी रुपये खर्च करून वेंगुर्ले शहरापर्यंत आणलेला आहे. निशाण तलावाची उंची वाढवल्यामुळे पुरेसा पाणीसाठा वेंगुर्ले शहराला उपलब्ध आहे. असेही केसरकर यावेळी म्हणाले.

विनायक राऊतांवर टीका

काहीतरी येऊन भाषण करायची, काहीतरी शिवराळ भाषेत बोलायचं याला कोकण म्हणत नाहीत, आणि ही शिवराळ भाषा कदाचित एका राऊतांकडून दुसरे राऊत शिकले असतील असे मला वाटते. आडनाव सारखं असलं म्हणून तसं घाणेरडे बोलले पाहिजे असं नाही. ताटामध्ये घाण करायची तुम्हाला सवय असेल आम्हाला नाही अशी टीका दीपक केसरलर यांनी विनायक राऊत यांच्यावर केली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!