12.8 C
New York
Monday, May 20, 2024

Buy now

उपवडेत भाजपला धक्का | आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शेकडो भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

उपवडे  : धावलवाडी व फोपळवाडी येथील असंख्य भाजप व राणे समर्थक कार्यकर्ते यांनी आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला.आमदार वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून सर्वांचे पक्षात स्वागत केले. व पुढील काळात शिवसेना पक्षात योग्य मान सन्मान केला जाईल असे अश्वासित केले. आमदार वैभव नाईक यांनी विविध योजना मधून लाखो रुपयांचा विकास निधी देऊन या भागातील ग्रामस्थांची विविध विकास कामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे आमदार नाईक यांच्या या कार्यावर विश्वास ठेवत येथील भाजप व राणे समर्थक दशरथ राऊळ व प्रतीक्षा राऊळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज हा पक्षप्रवेश केलेला आहे.

फक्त निवडणूक आली कि नागरिकांना खोटी आश्वासने द्यायची आणि निवडणूक झाली कि सगळं विसरून जायचं हे राणेंचं नेहमीचं कृत्य जनता विसरलेली नाही. उपवडे भागातील नागरिकांनाही अश्याच प्रकारची अनेक आश्वासने राणे समर्थक कार्यकर्त्यांकडून देण्यात आलेली होती. राणेंच्या याच खोट्या प्रवृत्तींमुळे सर्वसामान्य कार्यकर्ता उघडा पडतो आणि परत त्याचे हे दुःख व्यक्त करण्याचा त्याला अधिकारही नसतो, परंतु आता राणेंच्या या दादागिरीला जनता भीक घालणार नाही. आणि त्याचीच हि ठिणगी आज उपवडेत पडलेली आहे.

उपवडे येथील दशरथ राऊळ, प्रतीक्षा राऊळ, लक्ष्मण राऊळ, अंकुश राऊळ, अनिता राऊळ, प्रमोद राऊळ, कृष्णा राऊळ, करिष्मा राऊळ, मितेश राऊळ, प्रथमेश राऊळ, अमृता राऊळ, करीना राऊळ, रेश्मा राऊळ, अंकिता राऊळ, निलेश राऊळ, नितीन राऊळ, निलेश राऊळ, निवास राऊळ, वैशाली राऊळ, शर्मिला राऊळ, सुवर्णा राऊळ, सखाराम कदम, रेश्मा कदम, सचिन कदम, विष्णू भरडे, लक्ष्मी भरडे, राजाराम भरडे, सुभद्रा भरडे, दशरथ भरडे, दीपक भरडे, दीपिका भरडे, सुमित भरडे, सुशांत भरडे, विजया भरडे, गणेश भरडे, संदीप भरडे, उदय शेडगे, रत्नप्रभा शेडगे, भाग्यश्री शेडगे, संदीप शेडगे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

याप्रसंगी शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, कृष्णा धुरी, राजू कविटकर, रमाकांत ताम्हानेकर, योगेश धुरी, रामभाऊ धुरी, संतोष राउळ, रितेश परब, अजित परब, पिंट्या उभारे, प्रतीक्षा सावंत, नामदेव सूर, गणपत परब, सागर चव्हाण, संदेश तोरस्कर आदि शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!