3.9 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

सामंतांच्या कार्यालयावरील बॅनर हटविला | किरण सामंतांनी चर्चांना दिला पूर्णविराम….

संपादक | मयुर ठाकूर : उद्योजक आणि शिवसेना नेते किरण सामंत यांच्या कार्यालयासमोर लावण्यात आलेले उदय सामंत यांचा फोटो असलेले बॅनर तसेच उदय सामंत यांचा स्वतंत्रपणे लावण्यात आलेला फोटो अचानक हटवण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीची उमेदवारी न मिळाल्यामुळे किरण सामंत नाराज आहेत आणि त्यातूनच हा प्रकार घडला असल्याची चर्चा सुरू आहे.उदय सामंत नाही तर किरण सामंत संपर्क कार्यालय असा बॅनर लागणार असल्याची भूमिका किरण सामंतांच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.यामुळे कोकणात राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसून येत आहे. दरम्यान याबाबत किरण सामंत यांची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र या कृतीतून किरण सामंत स्वतंत्र वाटचालीचे संकेत देत असल्याची चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअप स्टेटसची चर्चा

लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाल्यापासून किरण सामंत यांनी शिंदेसेनेकडून निवडणूक लढवण्यासाठी आपण इच्छुक असल्याचे उघडपणे मांडले. त्यानंतर उमेदवारी जाहीर होईपर्यंत मधल्या काळात किरण सामंत यांनी ठेवलेले स्टेट्स बऱ्याच वेळा चर्चेत आले. या मतदारसंघांमध्ये भाजपला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर किरण सामंत यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतली आणि पक्षासाठी काम करणार असल्याचे जाहीर केले. त्यांनी असे जाहीर केले असले तरी त्यांचे जवळचे कार्यकर्ते मात्र याबाबतची नाराजी व्यक्त करत होते. गेले काही दिवस रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीचा प्रचार सुरळीत सुरू आहे. किरण सामंत आणि मंत्री उदय सामंत हे दोघेही महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारामध्ये सहभागी होत आहेत. मात्र तरीही सर्व काही आलबेल नसल्याचा मुद्दा आता पुन्हा पुढे आला आहे. मंगळवारी ३० एप्रिल रोजी किरण सामंत यांनी ठेवलेले स्टेट्सही चर्चेत आले आहे. वेळेला जो उपयोगी पडतो तो आपला, असे त्यांनी स्टेट्समध्ये पोस्ट केले होते. त्यानंतर आज महाराष्ट्र दिनी दुपारी त्यांच्या रत्नागिरीतील संपर्क कार्यालयासमोर लावण्यात आलेला एक बॅनर हटवण्यात आला. त्यावर मंत्री उदय सामंत यांचा फोटो होता. त्या पाठोपाठ कार्यालयाच्या दर्शनी काचेवर लावण्यात आलेला उदय सामंत यांचा फोटोही काढण्यात आला आहे. तर आज पुन्हा किरण सामंतांच्या कार्यकर्त्यांनी मन की बात अशा आशयाचे स्टेट्स ठेवल्याचं पाहायला मिळालं. यातूनच सध्या कोकणच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असल्याचं समोर आलं आहे.

माध्यमांशी किरण सामंतांचा संवाद

माध्यमांनी या बाबत किरण सामंत यांच्याशी संपर्क साधला. यावेळी किरण सामंत यांनी अशी माहिती दिली की, उदय सामंत यांचं कार्यालय हे दुसरीकडे शिफ्ट झालेलं असल्याने नव्याने बॅनर लावण्यासाठी ते बॅनर हटविण्यात आले. उमेदवारी मिळाली नाही याचं दुःख होतच. पण आता महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे यांच्या प्रचारात आपण व्यस्त आहोत. आणि आपण महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनाच निवडून आणणार असल्याचा दावा किरण सामंत यांनी केला. त्यामुळे कुठेतरी चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!