15.2 C
New York
Thursday, August 21, 2025

Buy now

अंकुश जाधव यांची भाजपच्या जिल्हा प्रवक्तेपदी नियुक्ती

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे माजी समाज कल्याण सभापती अंकुश जाधव यांची भारतीय जनता पार्टीच्या सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सोमवारी ही नियुक्ती जाहीर केली. त्यानंतर याबाबतचे नियुक्तीपत्र आमदार नितेश राणे यांच्या हस्ते अंकुश जाधव यांना देण्यात आले.
अंकुश जाधव यांनी यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे समाज कल्याण सभापती या नात्याने मोठे कार्य केले आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर जिल्हा प्रवक्ते पदाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!