8.2 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

कोकणचा गतिमान विकास करण्याची क्षमता केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्यात – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राजापूर | मयुर ठाकूर : भारताचा गतिमान विकास करण्याची क्षमता पंतप्रधान नरेंद्र मोदी तर कोकणचा गतिमान विकास करण्याची क्षमता केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यात आहे. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना विक्रमी मताधिक्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांनी निवडून द्यावे, असे आवाहन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार हे अडवणूक, वसूली करणारे सरकार होते, अशी टीका फडणवीस यांनी केली.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राजापुरात आयोजित केलेल्या जाहीर प्रचार सभेत श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीयमंत्री नारायण राणे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे, उद्योजक किरण सामंत, माजी आमदार राजन तेली, प्रमोद जठार, बाळ माने, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
फडवणीस म्हणाले, नारायण राणे हे जगाच्या पाठीवर कुठेही असो, त्यांच्या डोळ्यासमोर नेहमीच कोकण असते. कोकणच्या विकासासाठी मला काय करता येईल, हा विचार त्यांच्या मनात सतत असतो. कोकणाच्या विकासाचे व्हिजन असलले नेते म्हणून राणेंची सर्वत्र आेखळ आहे. कोकणचा कायपालट करण्याची क्षमता नारायण राणे यांच्यात आहे. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून तुमच्या हक्काचा खासदार म्हणून राणेंना विक्रमी मताधिक्यांनी निवडून द्यावे, असे आवाहन फडणवीस यांनी कोकणसीयांना केले.
लोकसभेची निवडणुक ही गल्लीतील निवडणूक नाही आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएच्या हाती पुन्हा सत्ता द्यावी. राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीमध्ये 26 पक्षांची खिचडी आहे. या आघाडीतील प्रत्येक पक्षाला इंजिनाचा ताबा हवा आहे, त्यामुळे इंजिनामध्ये बसण्यासाठी ते व त्यांच्या परिवातील कुटुंबीयांना जागा आहे. तर मोदींचे इंजिन असेलल्या विकासाच्या गाडीमधील प्रत्येक डब्यात सर्वसामान्यांना जागा आहे. राज्यातील ट्रिपल इंजिनचे महायुतीचे सरकार सर्वसामान्यांचे हित जपणारे सरकार आहे. मोदी सरकारने मागील 10 वर्षांत देशाचे चित्र व रुपडे पाटलून टाकले आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधानपदी बसविण्याची संधी लोकसभा निवडणुकीच्यानिमित्ताने देशवासीयांना आली आहे, या संधीचे सोने देशवासीयांनी करावे, असे आवाहन फडणवीस यांनी करताना मोदी सरकारच्या कामगिरीचा लेखजोखा आपल्या भाषणातून कोकणवासीयांसमोर मांडला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!