17.9 C
New York
Saturday, May 18, 2024

Buy now

आपल्या हक्काचा खासदार म्हणून मला रत्नागिरी-सिंधुदुर्गतील जनतेने विक्रमी मताधिक्यांनी लोकसभेत पाठवावे – ना. नारायण राणे

राजपूर | मयुर ठाकूर  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मागील दहा र्षांत भारत देश विकसित करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे भारत हा विकासित देश बनत आहे. मोदी सरकारने गरीब, महिला, बेरोजगारांसाठी चोपन्न योजना सुरु केल्या आहेत. त्याचा लाभ देशातील गरीब, महिला, बेरोजगारांनी घेत आपले जवीनमान सुधारले. लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएने चारशे जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एनडीएतील घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागले आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून मी निवडणूक लढवित असून आपल्या हक्काचा खासदार म्हणून मला रत्नागिरी-सिंधुदुर्गतील जनतेने विक्रमी मताधिक्यांनी लोकसभेत पाठवावे, असे आवाहन महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केले.

राजापूर येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत श्री. राणे बोलत होते. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे, उद्योजक किरण सामंत, माजी आमदार राजन तेली, प्रमोद जठार, बाळ माने, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

राणे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएने अबकी बार चारसो पारचा नारा दिला आहे. हा नारा सत्यात उतरण्यासाठी एनडीएतील घटक पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते अहाेरात्र मेहनत घेऊन काम करीत आहेत. कोकणात रोजगाराप्रश्न खूप गंभीर आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी मला लोकसभेत पाठवावे. देशात पुन्हा मोदींचे सरकार आल्यास आपण कोकणातील रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी या प्रांतात उद्योग व धंदे आणू, अशी घोषणा राणेंनी केली. मोदी सरकारने मागील दहा वर्षांत सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू ठेवून जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. अर्थव्यवस्थेत भारतचा क्रमांक अकरा होता, ते मोदी सरकारने तीन क्रमांकावर आणण्याची कामगिरी करून दाखवली. निसर्ग सौंदर्याने नटलेला प्रदेश आहे. पर्यटनाच्या माध्यमातून कोकणाचा विकास करणे सहज शक्य आहे. कोकणचा कॅलिफोर्निया करण्यासाठी आणि विकासाची समृद्धी आणण्यासाठी मला लोकसभेत पाठवून कोणकवासीयांची सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन राणेंनी केले. राणेंनी आपल्या भाषणात मोदी सरकारच्या कामगिरीचा लेखजोखा जनतेसमोर मांडताना त्यांनी विरोधकांवर कोणतीही टीका किंवा आरोप करणे टाळले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!