तर उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मत मागण्याचा अधिकार नसल्याची टीकाही आ.नितेश राणेंनी केलीय
कणकवली | मयुर ठाकूर : महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला सरळ सरळ आपला पराभव दिसू लागला आहे. मतदानाचा टप्पा आजही आहे आणि वातावरण पूर्ण मोदीमय झालेल आहे. संजय राजाराम राऊत ईव्हीएम च्या नावाने नाक रगडत बसलेला होता. ज्या ईव्हीएम वर कोर्टाने देखील शिक्कामोर्तब केलेला आहे. भारत देशात निवडणुका या ईव्हीएम वरच होणार आहेत. अस सरळ स्पष्ट कोर्टान सांगितले आहे.कितीही एव्हीएम च्या नावाने भुंकत बसलात तरी देशाच्या जनतेने ठरवलेल आहे की, पंतप्रधान म्हणून परत एकदा तिसऱ्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बसवायचे आहे. आणि एनडीएला ४०० सो पार करायच आहे.
उबाठा सेनेचा जाहीरनामा जाहीर झाला. ज्या उद्धव ठाकरेला पत्रकार परिषदे मध्ये जाहीरनामा नीट व्यवस्थित धरता येत नाही. सांभाळता येत नाही. त्या ठिकाणी पत्रकार परिषद सुरू असताना जाहीरनामा खाली पडला. ज्याला साधा जाहीरनामा हातात धरता येत नाही. ते लोक देशाच नेतृत्व करण्यासाठी हिम्मत कशी करतात. किंवा अशा नेत्यांचे खासदार निवडून देऊन देशाच्या किंवा महाराष्ट्राच्या जनतेच काही भलं होणार आहे काय .? म्हणून जो काही जाहीरनामा नावाचा कागद उद्धव ठाकरे यांनी काल प्रकाशित केला. त्यामुळे जो उद्धव ठाकरे स्वतःच्या वडिलांचे विचार पुढे घेऊन जाऊ शकला नाही. उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्व पणाला लावलं. उद्धव ठाकरेनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि पक्ष सत्तेच्या लाचारीसाठी गमावून टाकले. त्याच्या शब्दावर महाराष्ट्राच्या जनततेला विश्वास नाही. हे पुन्हा एकदा सिद्ध होणार आहे.
बाळासाहेबांची शिवसेना ज्याचं नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. आणि त्याच्याविरुद्ध चायनीज मॉडल शिवसेना ज्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत, असा थेट सामना आहे. आता जनतेला ठरवायचा आहे आता ओरिजनल शिवसेना पाहिजे की चायनीज मॉडल शिवसेना पाहिजे हे महाराष्ट्राचे जनता ठरवेल. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मत मागण्याचा अधिकार आता उद्धव ठाकरेंना राहिलेला नाही. अस टोला आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. यावेळी ते कणकवली येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, चायनीज मॉडल शिवसेनेला महाराष्ट्राची जनता नाकारेल. ज्यांनी कधी साधी सरपंच पदाची निवडणूक लढवली नाही. त्या माणसाने निवडणूकित मतदान करणाऱ्या मतदारांचे मत काय असतं हे त्याला माहीत नाही. तो जेव्हा निवडणुकीत निवडणुकीच विश्लेषण करतो त्यावेळी लोक किती पोट धरून हसत असतील याचा कदाचित अंदाज संजय राऊत यांना नसेल. त्यामुळे ३५ सोडा त्यातील ३ खासदार तुमच्या पक्षाचे आले तर नशीब समजा, असा टोलाही आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
तर ज्या वचन नाम्याच्या मुख्य कव्हर वर आदित्य ठाकरे यांचा फोटो आहे. ते महिला सबलीकरणची भाषा कशी करू शकतात. ज्याच्यावर दिशा सालीयानचा खुनाचा आरोप आहे. ज्याच्यावर गॅंग रेप करून खुनाचा आरोप आहे. ज्या संजय राजाराम राऊतवर डॉक्टर महिलेला छळण्याचा आरोप आहे. त्या लोकांच्या जाहीरनाम्यामध्ये अगर महिला सबलीकरण हा मुद्दा असेल तर लोक त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. देशाचे आणि महाराष्ट्राची बेरोजगारी दूर करन म्हणजे स्वतःच्या मुलांना वाईनची कंपनी उघडून देण्यासारखं नाही. अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या तरुणांची बेरोजगारी दूर झालेली नाही. फक्त राऊतांच्या दोन मुलींची आणि उद्धव ठाकरे च्या दोन मुलांची एवढीच बेरोजगारी दूर झालेली आहे. त्यामुळे याला बेरोजगारी मिटवणे बोलत नाही, असा सणसणीत टोलाही आ. नितेश राणे यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
यु टर्न म्हणजे उद्धव ठाकरे – आ. नितेश राणे
यु टर्न चा आता नवीन अर्थ उद्धव ठाकरे. जिथे यू टर्न दिसेल तिथे उद्धव ठाकरे असं उच्चारलं जातं. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये एक पण दिलेला शब्द पाळला नाही. सोमवारी काहीतरी बोलायचं आणि बुधवारी काहीतरी वेगळच बोलायचं. यालाच म्हणतात उद्धव ठाकरे आणि यालाच म्हणतात यु टर्न. म्हणून यु टर्नची भाषा संजय राजाराम राऊत यांनी करू नये.
उज्वल निकम यांच्या बद्दल जर बोलायचं झालं तर उज्वल निकम यांना मानणारा फार मोठा वर्ग आहे. उज्वल निकम हे देशाचे फार मोठे वकील आहेत. उज्वल निकम यांच्याबाबत योग्य तो निर्णय झाला तर निश्चित पद्धतीने त्याचा स्वागत होईल.