-1.8 C
New York
Monday, February 23, 2026

Buy now

विनायक राऊत यांचे डिपॉझिट जप्त करणार : ना. नारायण राणे

सावंतवाडी : मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये केवळ मोदींच्या नावामुळे निवडून गेलेले खासदार विनायक राऊत आता भाजपच्या विरोधात बोलू लागले आहेत. मागील दहा वर्षात कोणतेही काम करू न शकलेले राऊत विकासाच्या बाबतीत सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत त्यांचे डिपॉझिट जप्त करणार असा विश्वास रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी आमदार राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, पुखराज पुरोहित आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!