महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या विजयाचा केला संकल्प
संपादक | मयुर ठाकूर : सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हजारो कार्यकर्ते दाखल झाले आहेत, त्यामुळे तुफान गर्दी झाली आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील हे कार्यकर्ते मारुती मंदिर परिसरात गोळा झाले आहेत .या मोठ्या संख्येने आलेल्या गाड्यांमुळे रत्नागिरी येथे वाहनांमुळे गर्दी झाली आहे. थोड्याच वेळात केंद्रीय मंत्री नारायण राणे आपला उमेदवारी अर्ज भव्य रॅली काढून दाखल करणार आहेत.
रत्नागिरी मारुती मंदिर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असे भारतीय जनता पार्टी व माहितीच्या कार्यकर्त्यांची भव्य रॅली होणार आहे.या रॅलीत केंद्रीय मंत्री उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत,मंत्री रवींद्र चव्हाण, ना.दीपक केसरकर , ना.उदय सामंत,राष्ट्रवादी आमदार श्री निकम, माजी खासदार निलेश राणे, भाजप आमदार नितेश राणे, सेना नेते किरण भैया सामंत,माजी आमदार बाळ माने, जिल्हाध्यक्ष श्री. पटवर्धन, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आंग्रे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक,माजी आम.प्रमोद जठार,माजी आमदार राजन तेली, माजी आमदार अजित गोगटे, बँक अध्यक्ष मनिष दळवी, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर,गोट्या सावंत, मनोज रावराणे , समीर नलावडे आदींसह भारतीय जनता पार्टीचे दोन्ही जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. तर रत्नागिरी मधील महायुतीचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थितीत होते.