कणकवली | मयुर ठाकूर : ही कोकणच्या विकासाची निवडणूक आहे. राष्ट्राच्या विकासाची ही निवडणूक आहे. या सगळ्याचा विचार कोकणातील सर्व प्रमुख नेत्यांनी केला आणि त्यातून चांगल्या पद्धतीने सगळेजण एकसंघ राहतील. त्यामुळे ना. नारायण राणे यांना ही उमेदवारी देण्यात आली. आणि महायुतीला सगळे घटक पक्ष ना. नारायण राणे यांच्या पाठीशी उभे राहतील. ना. नारायण राणे अडीच लाखांच्या मताधिक्याने विजयी होणार आहेत. सर्व कार्यकर्त्यांना याचा आनंद आहे की, रत्नागिरी सिंधुदुर्गच्या उमेदवारासाठी ना. नारायण राणे यांचे नाव घोषित झाले.
आठ दिवसांपूर्वी विनायक राऊत, वैभव नाईक यांनी सांगितले होते की, आपण हॅट्रिक पूर्ण करू. मात्र त्यांनी अशी प्रतिक्रिया देऊन आम्हाला सुद्धा एक प्रकारचे बळ दिलेल आहे. ना. नारायण राणे यांची सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्यात किती ताकद आहे हे आता सांगत नाही. तर ४ जूनला खासदार राऊत यांना व आमदार वैभव नाईकांना उत्तर देऊ अशी, प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले, ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलेल आहे, त्यापेक्षा चौपट पद्धतीने ताकद लावून ना. नारायण राणे यांना विजयी करण्याची ताकद आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे आरोप करणाऱ्यांना ४ जूनला आमची ताकद काय आहे हे विजयाच्या रुपाने दाखवू,असा इशारा माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिला आहे.