कणकवली | मयुर ठाकूर : हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत बस स्थानकांना मूल्यांकन देण्यासाठी स्वच्छता समितीने मंगळवारी कणकवली बस स्थानकाची पाहणी केली. बस स्थानक परिसर स्वच्छतागृह पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी सुविधांची पाहणी करून कणकवली बस स्थानक हे जिल्ह्याचे मध्यवर्ती बस स्थानक असून त्यात सुधारणा करण्यासाठीचा सूचना दिल्या.
स्वच्छता समिती मधील रत्नागिरी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, उपयंत्र अभियंता मृदुला जाधव, कामगार अधिकारी विलास चौगुले यांची टीम कणकवली बस स्थानकात दाखल होत तालुका मध्ये असणारा स्वच्छता व आदी श्री सुविधांचे पाहणी केली यामध्ये बस स्थानकात प्रवासांना वेळ पाहण्यासाठी घड्याळ लावलेले नसल्याचे निदर्शनास आले तसेच परिसरातील कचरा गोळा करून तो तिथेच जाळला जातो. या संदर्भात श्री. बोरसे यांनी कचरा स्थानक परिसरात न जाळता तो गोळा करून कचरापेटीत टाकून त्याची विल्हेवाट लावावी अशा सूचना दिल्या. स्थानकाच्या आजूबाजूचा परिसर फिरून पाहणी केली असता त्यांना बऱ्याच ठिकाणी घाणीचा कचऱ्याचा आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागला. त्यावेळी त्या अधिकाऱ्यांनी स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना अशा घाणीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे कणकवली आगार व्यवस्थापकांना सांगितले. तसेच कर्मचाऱ्यांसाठी असणारे स्टाफ रूम तसेच एसटी ची साफसफाई कशा पद्धतीने होते याची देखील त्यांनी माहिती जाणून घेतली.
पिण्याच्या पाण्याची सोय ज्या विहिरीतून होते त्यामध्ये झाडांची पाणी पडत असल्याने विहिरीला हिरवे नेट लावावे तसेच विहिरी भोवती नेहमी स्वच्छता ठेवावी अशा सूचना दिल्या. तसेच रजिस्टर च्या नोंदी तपासून त्यामध्ये सुधारणा होण्याची गरज असल्याचे सांगितले.