15 C
New York
Wednesday, April 23, 2025

Buy now

बॅग लिफ्टींग करणारे मध्यप्रदेश राज्यातील चार सराईत आरोपींना ब्रिझा कारसह केले जेरबंद

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाची कारवाई

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लक्झरी बस मधुन बॅग लिफ्टींग करुन त्यातील दागिने व रोख रक्कम चोरी करुन घेवुन गेलेबाबत कणकवली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२), भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१(४), भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (सी) हे गुन्हे ३० ऑगस्ट २०२४, २३ जानेवारी २२०५ व २७ फेब्रुवारी २२०५ रोजी दाखल होते.

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधिक्षक कृषिकेश रावले, स्थानिक गुन्हे अन्वेषण चे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना आदेशित करुन नमुद गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत सुचना दिलेल्या होत्या. प्राप्त सुचनांच्या आधारे १० एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेची दोन विशेष पथके कणकवली उपविभागात हायवे महामार्गाने गस्त घालत असताना गोपनीय माहितीनुसार असलदे येथील हॉटेल ग्रीनफिल्ड हॉटेल, कणकवली येथे संशयितरित्या चार इसम वावरत आहेत, अशी माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरुन तात्काळ गस्त करीत असलेली पथके हॉटेल ग्रीनफिल्ड येथे जावुन त्या चारही संशयित इसमांना त्यांचे ताब्यातील ब्रिझा कार क्रमांक एमपी ४१ झेडसी ४६४१ सह सापळा रचून शिताफिने ताब्यात घेतले.

संबंधितांकडे चौकशी केली असता जाहीर निजामुद्दीन खान ( वय- ४०, रा. खेडवा, ता. मनावर, जि. धार, राज्य-मध्यप्रदेश)
), जाहीर आयुब खान ( वय ४० रा. खेडवा, तहसिल- मनावर, जि.धार, राज्य-मध्यप्रदेश ), रब्दर सोजर हुसैन ( रा.सोजरखा, उखल्दा, उमर्बन, राज्य-मध्यप्रदेश ), रफिक नियाज खान ( वय ४० रा. उमर्बन, ता. मनावर, जि.धार, राज्य मध्यप्रदेश ) अशी नवे असल्याचे सांगितले. ब्रिझा कारची तपासणी केली असता ( केए १२ एमबी १८७० ) च्या दोन नंबर प्लेट, ( जिजे ०१ केव्ही ९३६६ ) च्या दोन नंबर प्लेट अशा एकुण चार बनावट नंबरप्लेट मिळुन आल्या. त्याबाबत अधीक चौकशी करता त्यांनी आपण हॉटेलवर येणाऱ्या लक्झरी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बॅगांमधील सोने – चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरण्यासाठी मध्यप्रदेश येथून आलेलो आहे. गरजेनुसार लोकांची व पोलीसांची दिशाभुल करण्यासाठी वेगवेगळ्या नंबरप्लेटस्चा चलाखीने वापर करीत असतो. नंबरप्लेट असलेल्या फ्रेममध्ये चलाखीने पुर्वीची नंबरप्लेट काढुन दुसरी नंबरप्लेट लावतो. या सर्व नंबरप्लेटस् सनरुफ किंवा गाडीच्या वरील छतामध्ये आतल्या बाजुस न दिसतील अशा लपवुन ठेवण्यात येतात. वापरत्या गाडीच्या कमीत-कमी तीन ते चार चाव्या सोबत ठेवण्यात येत असुन आवश्यकतेप्रमाणे त्याचा वापर करण्यात येतो. याशिवाय गाडीकरीता वापर करण्यात येत असलेल्या सर्व नंबरप्लेटस् या त्याच वाहनाच्या प्रकाराशी जुळणाऱ्या असतात. या नंबरप्लेटस् ज्या जुन्या वापरत्या गाड्या वेगवेगळ्या ऑनलाईन संकेतस्थळांवर विक्रीसाठी उपलब्ध असतात अशा गाड्यांचे वेगवेगळ्या राज्यातील गाडी नंबर काढुन त्यानुसार बनविल्या जातात. तसेच हायवे वरील लक्झरी बसेस थांबणारी ठिकाणे चोरीसाठी टार्गेट केली जातात.

आरोपींकडे सखोल चौकशी केली असता, त्यांनी यापुर्वी मुंबई गोवा हायवेवर कणकवली येथील असलदे, नांदगाव व ओसरगांव येथे लक्झरी बसमधुन बॅग लिफ्टींग करुन सोने व रोख रक्कम चोरुन घेवुन गेल्याचे कबुल केले आहे.

चारही आरोपी हे मध्यप्रदेश राज्यातील असुन आपल्या राहत्या ठिकाणांवरुन साथीदारांसह स्वतःच्या मालकीच्या चारचाकी वाहनाने (ब्रिझा व क्रेटा) इ. सारख्या वाहनाने निघुन महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये लक्झरी बसेस थांबा असलेल्या हॉटेलच्या ठिकाणी बसमधील प्रवाशांच्या बॅगांची, रोख रक्कम व मौल्यवान वस्तुंची चोरी करतात. त्याअनुषगांने वरील चारही आरोपींच्या गुन्हा पध्दतीनुसार ते महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात व परराज्यात आवश्यकतेप्रमाणे पत्रव्यवहार करण्यात येत असुन पुढील तपास कणकवली पोलीस करीत आहेत.

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक सिंधुदुर्गचे सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, यांच्या मार्गदर्शनाखाली

पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, रामचंद्र शेळके, सहा. पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, गुरुनाथ कोयंडे, पोलिस हेडकॉन्स्टेबल डॉमनिक डिसोझा, सदानंद राणे, प्रमोद -काळसेकर, किरण देसाई, बस्त्याव डिसोझा, आशिष जामदार व चंद्रकांत पालकर या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!