प्रमुख संशयिताच्या कोल्हापुरातून आवळल्या मुसक्या
कुडाळ आणि निवती पोलिसांची कारवाई
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील चेंदवण येथील बेपत्ता सिद्धिविनायक अंकुश बिडवलकर याच्या बेपत्ता प्रकरणी संशयित चौघानाही ताब्यात घेण्यात कुडाळ आणि निवती पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील तिघा संशयितांना आज दुपारीच ताब्यात घेण्यात आले होते. तर मुख्य संशयितास कोल्हापूरमधून आज रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले. कुडाळ आणि निवती पोलिसांनी ही कारवाई केली आहे.