हळवल येथील श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सव उत्साहात साजरा
कणकवली : तालुक्यातील हळवल येथील श्री राम मंदिरात मोठ्या उत्साहात श्री रामनवमी उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा झाला. दुपारी रामजन्म सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच रामरंगी भक्तगण रंगले होते. रामजन्मी उत्सवानिमित्त राम मंदिरामध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील झाले.
येथील मंदिरात राम नवमी उत्सवानिमित्त सकाळी आस्तिक बँड पथक -वरळी कोळीवाडा,मुंबई यांचे सुस्वर बँड वादन, श्रीराम षोडशोपचार पुजा, उत्सवाचं ग्रामदेवतेला आमंत्रण, ह.भ.प. नामदेव पांडुरंग महाराज यांचे श्रीराम जन्माचे कीर्तन, दुपारी १२ वा. राम जन्म सोहळा दर्शन, श्रीराम पालखीचे अभंग ढोल ताशांच्या गजरात व राम नामाच्या जयघोषात प्रदक्षिणा, सायंकाळी भाविक व बाल गोपाळांचा हरिपाठ, श्रीराम पालखीचे अभंग, टाळ, ढोल ताशाच्या गजरात व श्रीराम नामाच्या जय घोषात प्रदक्षिणा, कीर्तन व दशावतारी नाटक ( श्री शिवराई रवळनाथ नाट्यमंडळ, हळवल संचालक – अरुण राणे ) असे कार्यक्रम झाले. दरम्यान या श्री रामनवमी उत्सवाला भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती.