15 C
New York
Wednesday, April 23, 2025

Buy now

१ लाख सांभाळण्याच्या नादात २० हजारांना फटका

कणकवली शहरातील एका राष्ट्रीयकृत बँकेतील प्रकार ; पोलीस घटनास्थळी दाखल

कणकवली : शहरातील एका राष्ट्रीयकृत परिसरात हात चलाखी करत एका व्यक्तीचे २० हजार रुपये दिवसाढवळ्या लांबविल्याची घटना आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. ही घटना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ज्या व्यक्तीची फसवणूक झाली त्याने तात्काळ पोलिसांशी संपर्क केला. दरम्यान कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश शेडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, कसवन – तळवडे येथील एक व्यक्ती पैसे भरण्यासाठी एका राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत रांगेत उभी राहिली होती. यादरम्यान तिथे असलेल्या दोन पैकी एका तरुणाने तिथे बाहेर काहितरी प्रॉब्लेम झाला आहे असे भासवले. तसेच आमच्याकडील हे १ लाख रुपये तुमच्या हातात ठेवा आणि अर्जंट तुमच्याकडील २० हजार रुपये द्या. आधार कार्ड दाखवून २० हजार रुपये भरायचे आहेत, असे एका व्यक्तीने सांगितले.

यावेळी या फसवणूक झालेल्या व्यक्तीच्या हातात नोटांच्या आकाराचे बंडल असलेली पिशवी देत पिशवी तुमच्याजवळ ठेवा आलोच असे सांगून निघून गेले. दरम्यान काही वेळात फसवणूक झालेल्या व्यक्तीच्या ही बाब लक्षात येताच त्याने बाहेर जात पाहिले असता ते दोन्ही व्यक्ती घटनास्थळी नव्हते. त्यानंतर त्यांनी १ लाख म्हणून दिलेल्या पिशवीतील पिशवी उघडून पाहिली असता त्यामध्ये नोटांच्या आकाराचे बंडल केलेले कागद आढळून आले. या प्रकाराने त्या फसवणूक झालेल्या व्यक्तीला एकच मोठा धक्का बसला.

मात्र शाखेत घडलेल्या या प्रकारामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपासाची सूत्रे हलविली असल्याचे समजते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!