10 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

स्थानिक कर्मचाऱ्यांना हक्क आणि मानधन वेळेवर मिळालेच पाहिजे नाहीतर गाठ आमच्याशी- वैभव नाईक

स्थानिक कर्मचाऱ्यांना हक्क आणि मानधन वेळेवर मिळालेच पाहिजे नाहीतर गाठ आमच्याशी- वैभव नाईक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारावरून वैभव नाईक आक्रमक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दिली धडक

सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : ओरोस येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या जिल्ह्यातील तब्बल १२० हुन अधिक स्थानिक कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्याचे मानधन स्मार्ट सर्व्हिसेस प्रा. लि. या पुणे येथील ठेकेदार कंपनीने दिलेले नाही. त्यामुळे स्थानिक कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याने माजी आमदार वैभव नाईक यांनी गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धडक देत डीन अनंत दवंगे यांना कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत विचारणा केली. पुणे येथील ठेकेदार स्थानिक कर्मचाऱ्यांवर अन्याय करत असेल तर तो आम्ही खपवून घेणार नाही. स्थानिकांना हक्क आणि मानधन वेळेवर मिळालेच पाहिजे नाहीतर गाठ आमच्याशी आहे असा इशारा वैभव नाईक यांनी दिला.

ओरोस येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तरुण- तरुणी कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. सहा महिन्यापूर्वी त्यांच्या मानधनात कपात करण्यात असून गेल्या दोन महिन्यांचे मानधन देखील संबंधित ठेकेदार कंपनीकडून देण्यात आलेले नाही. तसेच इतर आवश्यक बाबींची पूर्तता केलेली नाही.दोन महिने पगार न झाल्यामुळे अन्य गावातून व तालुक्यातून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना विविध प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. एसटी प्रवास खर्च, आणि जेवणाच्या खर्चाचा प्रश्न निर्माण होत आहे.कर्मचाऱ्यांच्या करारानुसार २ महिन्यापेक्षा जास्त दिवस पगार थकीत ठेवता येत नाही. मात्र पगाराबाबत ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. अशी तक्रार स्थानिक कर्मचाऱ्यांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडे केल्यानंतर वैभव नाईक यांनी काल गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धडक देत डीन अनंत दवंगे यांच्याशी चर्चा केली. स्थानिक कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर दुर्लक्ष केल्याबाबत डीन यांनाही वैभव नाईक यांनी खडेबोल सुनावले. तसेच डीन यांच्या समक्ष संबंधित ठेकेदाराला फोन लावून फैलावर घेतले. त्यानंतर ठेकेदाराने गुरुवारी सिंधुदुर्गात येऊन पगाराबाबत कार्यवाही करण्याचे मान्य केले.

याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,भाऊ चव्हाण, बाळ महाभोज, रानबांबुळी माजी सरपंच श्री. बांबूळकर, राजु नाडकर्णी, समीर लाड, आनंद चिरमुले, सिद्धेश मांजरेकर व अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!