विजेत्यांवर होणार बक्षिसांचा वर्षाव
जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन
कणकवली | मयुर ठाकूर : श्री विश्वकर्मा मित्रमंडळ कणकवली च्या वतीने ८ मार्च २०२५ रोजी भव्य राज्यस्तरीय बैलगाडी शर्यत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शासनाच्या सर्व अटी व नियमांचे पालन करून संपन्न होणार आहे. कणकवली निम्मेवाडी येथील मैदानावर ही बैलगाडी शर्यत स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आतापर्यंत ३५ ते ४० बैलगाडी मालकांनी नोंदणी केली आहे. अजूनही काहीजण सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करत आहेत.
विजेत्यांवर होणार बक्षिसांचा वर्षाव
या बैलगाडी शर्यत स्पर्धेच्या निमित्ताने स्पर्धेत विजेत्यांना प्रथम पारितोषिक २००२६ व ढाल, द्वितीय क्रमांकास १५०२५ व ढाल, तृतीय क्रमांकास १००२५ व ढाल, चतुर्थ क्रमांकास ७०२५ व ढाल, पाचव्या क्रमांकास ५०२५ व ढाल, सहाव्या क्रमांकास ३०२५ व ढाल, सातव्या क्रमांकास २०२५ व ढाल, आठव्या क्रमांकास २०२५ व ढाल तसेच उत्कृष्ट बैलजोडी आणि जॅकीस ढाल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. बक्षिस वितरण समारंभ ८ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
या बैलगाडी स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री विश्वकर्मा मित्रमंडळ कणकवली च्या वतीने करण्यात आले आहे.