30.5 C
New York
Wednesday, July 9, 2025

Buy now

बँकयोजनांचा फायदा स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक उन्नतीसाठी करावा जिल्हा बँक कायम तुमच्यासोबत: मनिष दळवी

सिंधुदुर्ग जिल्हा बँक मळेवाड शाखा एटीएम् सेंटरचा शुभारंभ

सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : जिल्ह्यातील छोटे व्यावसायिक, शेतकरी, महिला यांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी बँकेच्या विविध सेवा सुविधांचा लाभ घेत असतांना त्यांनी जास्तीत जास्त डिजिटल बँकींगच्या पर्यायाचा वापर करणे आवश्यक आहे. महिलांना विविध बँकीग सुविधांचा वापर करत असतांना मार्गदर्शन व्हावे यासाठी जिल्हा बँकेने बँक सखी सारखी सुविधा उपलब्ध केलेली असून माजी केद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नांतून प्रधानमंत्री पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यासारख्या शासकिय योजना जिल्हा बँक राबवित असून या योजनांचा फायदा स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक उन्नतीसाठी करावा यासाठी जिल्हा बँक कायम तुमच्यासोबत राहिल असे अभिवचन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी दिले.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मळेवाड शाखेच्या एटीएम् सेंटरचा शुभारंभ दि. ०३/०३ /२०२५ रोजी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते करण्यात आला त्या प्रसंगी ते बोलत होते. एटीएम् सेंटर चे उद्धाटन अध्यक्ष महोदय यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फीत कापुन करण्यात आले. प्रस्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी केले. याप्रसंगी जागेचे मालक सगुण नाईक, व बँकेच्या मळेवाड शाखेचे नुकतेच सेवानिवृत्त झालेले लक्ष्मीकांत गावडे यांचा शाल व श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला.

आजगाव विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष एकनाथ नारोजी, मळेवाड ग्रा.पं.उपसरपंच हेमंत मराठे, गुरुनाथ मुळीक, सेवानिवृत्त शिक्षक वसंत राणे यांन बँकेबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच उपसरपंच हेमंत मराठे यांनी ग्रामस्थांच्या हस्ते अध्यक्ष मनिष दळवी व संचालक विद्याधर परब, रविंद्र मडगावकर यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी जिल्हा बँकेचे संचालक सर्वश्री विद्याधर परब, रविंद्र मडगावकर तसेच मळेवाड गावाच्या सरपंच सौ. मीनल पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे, मळेवाड विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश पार्सेकर, वेतोबा विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष सखाराम ठाकूर, श्री. रमाकांत नाईक, गणपत टोपले, गजानन शिरसाट, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे व जिल्हा बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!