15 C
New York
Wednesday, April 23, 2025

Buy now

येणाऱ्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका; कार्यकर्त्यांच्या पाठीशी ताकदीने राहणार- वैभव नाईक

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कुडाळ तालुका कार्यकारिणी बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद

विभागीय पक्ष निरीक्षक पदी कृष्णा धुरी व सचिन कदम व कुडाळ शहर निरीक्षक पदी सुशील चिंदरकर यांची नियुक्ती

कुडाळ | मयुर ठाकूर : आजपर्यंत जे जे कोणी शिवसेना सोडून गेले आहेत त्यांची ताकद निष्ठावंत शिवसैनिकांनी मोडून काढली आहे. जो पर्यंत निष्ठावंत शिवसैनिक आहेत तोपर्यंत शिवसेनेला धक्का लागणार नाही. निष्ठावंतांची नावे अभिमानाने घेतली जातात आणि भविष्यातही घेतली जातील. केवळ जिल्हा परिषद सदस्य किंवा नगरसेवक होण्यासाठी शिवसेना नाही तर जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना आहे. लोकांचे प्रश्न आपण हिरहिरीने सोडविले पाहिजेत. येणाऱ्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणूका आहेत. या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी ताकदीने उभा राहणार आहे. ३१ मार्च नंतर शिवसेनेच्या विधानपरिषद खासदार आणि आमदार यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना निधी मिळवून देणार असल्याचा विश्वास कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कुडाळ तालुका कार्यकारिणीची बैठक आज माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल क्र.२ येथे संपन्न झाली. यावेळी उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत, महिला जिल्हा आघाडी प्रमुख श्रेया परब, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, निमंत्रित सदस्य अतुल बंगे,महीला आघाडी तालुका प्रमुख स्नेहा दळवी, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, उपतालुकाप्रमुख सचिन कदम, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर, युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी, शहरप्रमुख संतोष शिरसाट, निमंत्रित सदस्य रमाकांत ताम्हाणेकर, सौ. पवार, अनुप नाईक, अवधूत मालणकर,सुशील चिंदरकर, अवि तेंडोलकर, संदीप म्हाडेश्वर, दिपक आंगणे, अशपाक कुडाळकर, संदेश प्रभू, नागेश ओरोसकर, अनघा तेंडोलकर, बंड्या कुडतरकर, नरेंद्र राणे, कौशल जोशी, संदीप सावंत, मेघा सुकी संतोष अडूळकर, सागर भोगटे,विनय गावडे, शैलेश घाटकर,महेश जामदार, सचिन ठाकुर, रवी कदम, राजू घाडीगावकर, एम. बी गावडे, महेश वेळकर, सागर वाळके, संतोष पाटील, दीपेश कदम यांसह शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे विभाग प्रमुख,विभाग संघटक,उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, बुथप्रमुख, माजी जि.प.सदस्य, माजी पं.स. सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं.सदस्य यांसह स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी -माजी लोकप्रतिनिधी,विविध सेलचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वैभव नाईक पुढे म्हणाले, महायुती सरकार गुजरातच्या फायद्यासाठी महाराष्ट्रावर अन्याय करत आहे. आधी महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळविले आणि आता अदानी कंपनीचे स्मार्ट मीटर जनतेच्या माथी मारले जात आहेत. छोट्याशा सेतू सुविधा केंद्राचे टेंडर देखील गुजरातच्या कंपनीला देण्यात आले आहे. आज आपले सरकार असते तर हे होऊच दिले नसते. त्यामुळे महाराष्ट्र लुटणाऱ्यांविरोधात आपण आवाज उठविला पाहिजे. राज्यात महिला सुरक्षित नाहीत, केंद्रीय मंत्र्यांची मुलगी देखील सुरक्षित नाही. तीची छेड काढली जात आहे. अनेक बलात्काराच्या घटना वारंवार घडत आहेत. ओसरगाव मध्ये अंगणवाडी सेविका महिलेला जाळण्यात आले. महायुती सरकार महिला सुरक्षितेत हतबल ठरले आहे अशी टीका वैभव नाईक यांनी यावेळी केली.
यावेळी अमरसेन सावंत, श्रेया परब, मंदार शिरसाट,अतुल बंगे आदी नेत्यांनी आपले विचार व्यक्त करत शिवसेना संघटना वाढीसंदर्भात मार्गदर्शन केले. दरम्यान यावेळी कुडाळ तालुक्यातील तेंडोली, नेरूर, पिंगुळी, माणगाव, घावनळे या जिल्हा परिषद विभागाच्या पक्ष निरीक्षक पदी कृष्णा धुरी व वेताळबांबर्डे, पावशी, कसाल,आंब्रड या जिल्हा परिषद विभागाच्या पक्ष निरीक्षक पदी सचिन कदम आणि कुडाळ शहर निरीक्षक पदी सुशील चिंदरकर यांची निवड करण्यात आली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!