15 C
New York
Wednesday, April 23, 2025

Buy now

दादागिरी आणि गुंडगिरी ची भाषा केल्यास पालकमंत्र्यांना या पुढील काळात शिवसेना स्टाईल ने उत्तर देऊ

माजी आमदार परशुराम उपरकर यांचा पालकमंत्री नितेश राणेंना इशारा

कणकवली : भाजपच्या मेळाव्यात पालकमंत्री नितेश राणे यांनी विरोधी पक्षांच्या सरपंचांना गावाच्या विकासासाठी निधी देणार नाही, असे विधान केले होते. त्यांचे हे विधान असंविधानिक आहे. राणे हे दादागिरी, गुंडगिरीकरून पक्ष वाढू पाहत आहेत. यापुढील काळात त्यांनी दादागिरी व गुंडगिरीची भाषा केल्यास शिवसेना स्टाईलने त्यांना प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा ठाकरे शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिला. तसेच पालकमंत्र्यांनी केलेल्या असंविधानिक विधानाविरोधात सर्वोच्च व उच्च न्यायालयात ठाकरे शिवसेना दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

येथील आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. उपरकर बोलत होते. उपरकर म्हणाले, पालकमंत्री नितेश राणे हे पदाचा गैरवापर करीत आहेत. भाजपच्या मेळ्वायात त्यांनी विरोधी पक्षांच्या सरपंचांना गावाच्या विकासासाठी निधी देणार नाही, असे विधान केले होते. त्यांचे हे विधान असंविधानिक आहे. संविधाननुसार मंत्रीपदाची शपथ राज्यापालांनी राणेंना दिली होती. ती शपथ पायदळी तुडविण्याचे काम राणेंकडून सुरु आहे. त्यांच्या या कृतीची तक्रार आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे करणार आहोत. त्याचप्रमाणे राणेंच्या विरोधात सर्वोच्च व उच्च न्यायलयात याचिका दाखल करणार आहेत, असे उपरकर यांनी सांगितले.

खासदार नारायण राणे हे शिवसेनेत असताना आम्ही त्यांच्यासोबत काम केले आहे. सिंधुदुर्गात त्यांनी पक्ष संघटना वाढवताना पदाचा गैरवापर न करता जनता व शिवसैनिकांना विश्वासात घेत संघटना वाढवली. मात्र, पालकमंत्री नितेश राणे पदाचा गैरवापर करून दादागिरी व गुंडागिरी पद्धतीने पक्ष संघटना वाढवताना दिसत आहेत. यापुढील काळात राणेंनी हे असंविधानिक पद्धती काम करण्याचा प्रयत्न केला, त्यांचा हा प्रयत्न शिवसेना स्टाईलने हाणून पाडू, असा इशारा उपरकर यांनी दिला.

भाजप हा संविधान न मानणार पक्ष आहे. भाजपचे नेतेमंडळी असंविधानिकपद्धतीने बेताल विधाने करीत आहेत. पाशवी बहुमताच्या जोरावर भाजप पक्ष मनमानी पद्धतीने काम करीत आहे, अशी टीका उपरकर यांनी केली. सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत, त्यामुळे विकासकामांसाठी पैशांची तरतूद करण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जिल्ह्यातील ठेकेदारांना कामांची बिले अद्यापही मिळालेली नाहीत. वैभववाडी व कळसुली येथील रेल्वे उड्डाणपुलांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून ही कामे नितेश राणेंनी पूर्ण करून दाखवावीत, असे आव्हान उपरकर यांनी दिले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!