20.1 C
New York
Friday, July 4, 2025

Buy now

पाकिस्तानवर भारताचा विराट विजय!

दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफीमधील पाचव्या आणि हायहोल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने यजमान पाकिस्तानवर दणदणीत विजय संपादन केला. विराट कोहलीच्या दमदार नाबाद शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने दिलेले 242 धावांचे आव्हान टीम इंडियाने सहज पूर्ण केले. या लाजिरवाण्या पराभवासोबतच पाकिस्तानने या स्पर्धेतील आव्हानही जवळपास संपुष्टात आले आहे.वि राट कोहली या सामन्याचा हिरो ठरला. विराटने शेवटपर्यंत फटकेबाजी करत जबरदस्त शतक झळकावले. विजयासाठी दोन धावांची गरज असताना कोहलीने खणखणीत कव्हर ड्राईव्ह मारत संघाचा विजय आणि त्याचे शतकही पूर्ण केले. टीम इंडियाने 42.3 ओव्हरमध्ये 244 धावा केल्या. पारंपारिक प्रतिस्पर्ध्यावर मिळविलेल्या या विजयामुळे देशभर दिवाळी साजरी होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!