मनोज मोंडकर व पूनम चव्हाण यांच्या तर्फे सलग पाच वर्षे आंगणेवाडी यात्रेकरूंसाठी मोफत बस सेवा पुरविण्यात येत आहे. शिवसैनिक यशवंत गांवकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मनोज मोंडकर, सौ. पूनम चव्हाण, प्रसाद चव्हाण , मोहन मराळ, भाई लुडबे, रविना लुडबे, श्री. खवळे, जयू लुडबे आदी उपस्थित होते. या बस सेवे बद्दल भाविकांनी मनोज मोंडकर व पूनम चव्हाण यांचे आभार मानले..