15 C
New York
Wednesday, April 23, 2025

Buy now

सिंधुरत्न योजनेअंतर्गत कुडाळ व मालवण तालुक्यातील ट्रान्सफार्मरसाठी ५ कोटी ५७ लाखांचा निधी मंजूर

सिंधुदुर्ग: सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत कुडाळ व मालवण तालुक्यातील वीज यंत्रणा बळकटीकरणासाठी ५ कोटी ५७ लक्ष एवढा निधी मंजूर झाला असुन आमदार निलेश राणे यांनी किनारपट्टीवरील विज यंत्रणा सुधारण्यासाठी विशेष लक्ष देत सिंधुरत्न मधून एकूण ३० ट्रान्सफार्मरची मागणी केली होती त्यानुसार सिंधुरत्न समृद्ध योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांनी पहिल्या टप्यात कुडाळ तालुक्यातील तीन तर मालवण तालुक्यातील सात अश्या दहा ट्रान्सफार्मरना मंजुरी दिली आहे. यात देवबाग मोबारवाडी ट्रान्सफार्मर, मालवण फोवकांडा पिंपळ येथे 100 kv ट्रान्सफार्मर, सर्जेकोट येथे 100 kv ट्रान्सफार्मर, वायरी भुतनाथ येथे 100 kv ट्रान्सफार्मर, कांदळगाव परबवाडा येथे 100 kv 6 ट्रान्सफार्मर DTC व 11 KV लाइन उभारणे, खैदा घुमडे येथे 100 KVA ट्रान्सफार्मर बसवणे, मालवण बोर्डिंग ग्राउंड येथे 100 KVAट्रान्सफार्मर बसवणे, गवळीवाडी नजीक, कुंभारमाठ येथे २०० KVA ट्रान्सफार्मर बसवणे, रांगणातुळसुली कदमवाडी येथे 100 KVA DTC ट्रान्सफार्मर बसवणे, बाव आंबेडकरनगर येथे 100 KVA DTC ट्रान्सफार्मर उभारणे, आंदुर्ले दाभोलकरवाडी येथे 100 KVA DTC बाव ट्रान्सफर्मर यान ट्रान्सफार्मर उभारणीसाठी मंजुरी मिळाली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!