मालवण :गडचिरोली येथे दि. १८ ते २२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अश्वमेध स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठाच्या संघात मालवणची सुकन्या लीना धुरी हिची ची ऍथलेटिक मधील ४०० मीटर या क्रीडा प्रकारात निवड झाली आहे. यावर्षी मुंबई विद्यापीठाच्या संघात फक्त १२ मुलींची निवड झाली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लीना धुरी या एकमेव खेळाडू मुलीची मुंबई विद्यापीठाच्या संघात अश्वमेध या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
लीना धुरी ही वायरी मालवण येथील मातोश्री राखी ताई पाटकर स्पोर्ट्स अकॅडमीची प्रशिक्षणार्थी असून अकॅडमीचे प्रशिक्षक ताराचंद पाटकर यांच्याकडून ती प्रशिक्षण घेत आहे. लीना हिच्या या निवडीबद्दल तिचे मालवणवासियांकडून अभिनंदन होत आहे.