सिंधुदुर्ग : मालवण तालुक्यातील आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेसाठी कोकण रेल्वे मार्गे सावंतवाडी ते लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान तिसरी विशेष गाडी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. याबाबत कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दि. २३ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजून २० मिनिटांनी ही गाडी (०११३४) सुटणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वा. २५ मिनिटांनी लो. टिळक टर्मिनसला पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ही गाडी (०११३३) दि. २४ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी सुटून सावंतवाडीला ती त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता पोहचणार आहे. ही आंगणेवाडी स्पेशल गाडी एकूण २० एलएचबी डब्यांची धावणार आहे.
ही गाडी कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी, राजापूर, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल, ठाणे या स्थानकांवर थांबे घेणार आहे. एकूण २० डब्यांची ही गाडी एलएचबी श्रेणीतील असेल. यात टू टायर वातानुकूलित १, श्री टायर वातानुकुलित ३, श्री टायर इकॉमी वातानुकुलित २, स्लीपर ८, सर्वसाधारण श्रेणीतील चार, जनरेटर कार एक तर एसएलआर एक अशी कोचरचना असेल.