कणकवली | मयुर ठाकूर : येथील सिद्धिविनायक मित्रमंडळातर्फे उपजिल्हा रुग्णालयासमोर माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. अतिशय भावपूर्ण वातावरणात श्री गणेशाची पूजन करण्यात आली. यावेळी विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सायंकाळी श्री गणेश मूर्तीची ढोल ताशा व फटाक्यांच्या आतिषबाजीत जानवली नदीवरील गणपती साना पर्यंत विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. साश्रु नयनांनी गणरायाला निरोप देण्यात आला.
गणपती बाप्पा …मोरया, एक – दोन – तीन – चार गपतीचा जय जयकार अशा घोषणा देत गणपती बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.
सिंधुगर्जना ढोलपथकाने विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला होता. सिद्धिविनायक मित्रमंडळातर्फे भाविकांना प्रसाद वाटप करण्यात येत होते.