कणकवली : गाळमुक्त नदी मोहिमेचा उद्या पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत उद्या शनिवारी सकाळी ठीक ९: ३० वाजता कणकवली येथील जाणवली नदीतील गाळ काढून गाळमुक्त नद्या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. कणकवली वरवडे उर्सुला शाळेजवळ नदीतील गाळ काढणे मोहीम राबवण्यात येणार आहे.पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ केला जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली.