6.7 C
New York
Tuesday, March 11, 2025

Buy now

जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याहस्ते ग्रामपंचायत लोरे नं‌१ कचरा संकलन ई-व्हॅनचा शुभारंभ

कणकवली | मयुर ठाकूर : ग्रामपंचायत लोरे नं १ च्या माध्यमातून व लोक सहभागातून ग्रामीण भागामध्ये जिल्हा पर्यटनाला साथ घालणार असं आगळंवेगळं श्री रुजेश्वर देवस्थान उद्यान साकार झाले आहे. २७ जानेवारी २०२५ रोजी उद्यानाचा उद्घाटन सोहळ्यास जिल्हाधिकारी अनिल पाटील, सिंधुदुर्ग यांनी भेट दिली. संपूर्ण उद्यानाची पाहणी करून या नावीन्यपूर्ण उपक्रमाची प्रशंसा केली.

जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत ई – कचरा व्हॅन शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमास शुभेच्छा व्यक्त करताना जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी गावात मुलींचा जन्म झाल्यास तिच्या नावे तसेच गावातील एखादी व्यक्ती मयत झाल्यास तिच्या नावे वृक्षारोपण करणे व त्या रोपांचा सांभाळ संबंधित कुटुंबाने करणे परिणामी स्मृती वन निर्माण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे तुळशीदास रावराणे, सिंधुदुर्ग, मनोज रावराणे माजी सभापती – पं.स.कणकवली, दिलीप तळेकर – तालुकाध्यक्ष कणकवली, भाजपा, सुरेश सावंत, अजय रावराणे – सरपंच ग्रामपंचायत लोरे नं.१, श्री.सुमन गुरव – उपसरपंच ग्रामपंचायत लोरे, राकेश गोवळकर, ग्रामपंचायत अधिकारी, दामोदर नारकर, नरेश गुरव तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!