वेंगुर्ले : आपल्या मित्रांसोबत शिरोडा वेळागर येथे फिरण्यासाठी आलेल्या एका रशियन युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी रेडी येथील रहिवासी सचिन शशिकांत रेडकर (वय ४०) यांच्यावर वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २८ जानेवारीला १२.४० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, वालेरिया दिमित्री बिलिव्हा (वय २३, रा. रशियन कॉलेज, व्यवसाय मार्केटिंग व टुरिझम, सध्या रा. गोवा) असे त्या रशियन युवतीचे नाव आहे. ती आपल्या मित्रांसोबत शिरोडा- वेळागर येथे फिरण्यासाठी आली असता फिरून झाल्यानंतर पुन्हा आपल्या गोवा येथील हॉटेलमध्ये जात असताना रेडी हुडा येथे आले असता त्यांच्या मित्रांची गाडी स्लीप झाल्याने त्यांना सावरण्यासाठी वालेरिया बिलीव्हा या थांबल्या असता संबधित युवकाने तेथे येऊन त्यांच्या अंगाला स्पर्श करून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे, अशी फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक तपास पीसीएसआय योगेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भोसले करत आहेत.