सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : कोणतीही गोष्ट अशक्य नाही सर्वांनी प्रामाणिकपणे आणि मनापासून काम केले तर मोठ्या मताधिक्याने महायुतीचा उमेदवार निवडून येईल असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कुडाळ शहर येथे घेतलेल्या सभेत केले. कुडाळ शहर महायुतीची सभा संपन्न झाली.
यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा पदाधिकारी रणजीत देसाई, संदीप कुडतरकर, माजी जिल्हा परिषद सभापती अस्मिता बांदेकर, राजू राऊळ, तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, आनंद शिरवलकर, शिवसेनेचे बंटी तुळसकर, अरविंद करलकर, तसेच नगरसेवक विलास कुडाळकर, निलेश परब, अभी गावडे, राजीव कुडाळकर, प्राजक्ता बांदेकर, चांदणी कांबळी, स्वीकृत नगरसेवक गणेश भोगटे, बंड्या सावंत उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तळागाळापर्यंत असलेल्या नागरिकांसाठी योजना केल्या या योजनांचा अनेकांनी लाभ घेतला देश महासत्ता होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आवश्यकता आहे. असे सांगून या मतदार संघाचा एक खासदार म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ४०० पार या घोषणेतील जोडला जाणारा मणी आहे त्यामुळे सर्वांनी मिळून एकजुटीने काम केले तर मोठ्या मताधिक्याने विजय महायुतीचा होईल यामध्ये कोणतीही शंका नाही असे सांगून विरोधक आता विकासाच्या गोष्टी करणार नाही तर भडकाऊ भाषणे करून लोकांची दिशाभूल करणार आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी स्वीकृत नगरसेवक राकेश कांदे यांनी केले.