मात्र त्या महिला कणकवलीत आल्या कशा ? त्या येण्यामागे कोणतं रॅकेट आहे का ? अशा प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित
कणकवली: बुधवारी शहरातील रेल्वे स्थानकावर दोन बांगलादेशी महिलांना सिंधुदुर्ग एटीएस च्या पथकाने ताब्यात घेतले आहे. यामध्ये साथी अतुल माझी ( वय ३२, रा. कल्याण ईस्ट, मुंबई मूळ रा. लेबु खाली ता. डोगरी, जिल्हा ढाका बांगलादेश), लिझा रहीम शेख ( वय २८, सध्या रा. बी विंग मेरिडियन गोल्ड सोसायटी, हडपसर पुणे, मूळ रा. ढाका बांगलादेश ) महिलांना एटीएसच्या पथकाने व कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान त्या दोन महिलांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, असल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांनी दिली.
या बाबा सविस्तर वृत्त असे की, कणकवली रेल्वे स्थानकावर गोपनीय माहितीनुसार दोन बांगलादेशी महिलांना सापळा रचून एटीएस चे पथक व कणकवली पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले होते. त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांची कसून चौकशी करण्यात आली. तसे त्यांच्याकडे भारतीय अधिवासाचे कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. दरम्यान त्यांच्याकडे भारतीय अधिवासाचे असल्याबाबत कोणतेही कागदपत्र आढळून आले नाहीत. त्यानुसार त्यांच्यावर विदेशी पारपत्र कलम १४अ, पारपत्र १९५० नियम ३ अ, ६ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते त्यावेळी त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रश्नांची उत्तरे अनुत्तरितच ( बॉक्स )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या महिलांना रेल्वे स्थानकावर पकडण्यात आले. पंरतु त्या बांगलादेशी महिला कणकवली तालुक्यात आल्या कशा ? कणकवलीत आल्या तर त्यांचे राहिवासाचे ठिकाण कोणते होते ? त्यांच्यासोबत अन्य कोणी महिला किंवा पुरुष आहेत का ? कणकवलीत येण्याचा त्यांचा हेतू काय ? अशा प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित राहिली आहेत.