गोळवण येथे ग्रामसंवाद उपक्रमास ग्रामस्थांचा प्रतिसाद
मसुरे : आजच्या ग्रामसंवाद उपक्रमात ग्रामस्थांनी मांडलेल्या समस्या पाठपुरावा घेऊन दूर केल्या जातील. ग्रामस्थ व पोलीस प्रशासन यांच्यात सुसंवाद असणे आवश्यक आहे. गावाच्या सुरक्षिततेला सुद्धा सर्वांनी महत्त्व देणे तितकेच महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांनी गोळवण येथे केले. सिंधुदुर्ग पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून सुरु असलेल्या उपक्रमाअंतर्गत गोळवण येथे ग्रामसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी सायबर गुन्हे, आर्थिक फसवणूक, बँक फ्रॉड याबाबत सर्विस्तर माहिती उपस्थिताना दिली. यावेळी शाळा गोळवण नं 1 च्या विद्यार्थ्यांनी सायबर गुन्हा व महिला सुरक्षा यावर पथनाट्य सादर केले. त्याला उपस्थितांकडून प्रतिसाद मिळाला. सर्व ग्रामस्थ, पोलीस अधिकारी यांनी रोख रकमेचे बक्षीस देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यावेळी गोळवण ग्रामपंचायत सरपंच सुभाष लाड, उपसरपंच शरद मांजरेकर, सदस्या सौ. प्राजक्ता चिरमुले, पोलीस पाटील अमित आंगचेकर, अद्विका डिकवलकर, राजेंद्र
चव्हाण, तंटामुक्त अध्यक्ष संजय पाताडे, माजी सैनिक सत्यविजय पालव, जनार्दन गावडे, माजी तंटामुक्त अध्यक्ष वासुदेव पावसकर, विठ्ठल तळवडेकर, नामदेव चव्हाण, एकनाथ चव्हाण, महादेव तेजम, गंगाराम गावडे, संतोष गावडे, संतोष चव्हाण, महादेव पवार, सत्यवान चव्हाण, वासूदेव आंगचेकर, गणेश तावडे, ब्रिजमोहन अग्रवाल, उत्तम पाताडे, मेघा घाडी, दिपश्री आंगचेकर, प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष पाताडे, संजय जाधव, अंगणवाडी सेविका समिधा नाडकर्णी, विणा जाधव, मिनल नाईक, रजनी पाडावे, आरोग्य सेवक वासुदेव वाडकर, सौ. पेडणेकर आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरपंच सुभाष लाड यांनी
केले. तर आभार ग्रामसेविका सौ शेलटकर यांनी मानले.