वागदे ,गोपुरी येथिल सन्मान परिषदेत प्रतिपादन
कणकवली: कंत्राटी कामगारांना किमान वेतन मिळाल्याशिवाय त्यांचे जगणे सुसह्य होणार नाही. कर्नाटक राज्यात ज्याप्रमाणे कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करण्यात आले. त्याचप्रमाणे फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा घेऊन महाराष्ट्रातील नगरपालिका कंत्राटी कामगारांना सरकारने कायद्याप्रमाणे त्यांचे हक्क द्यावेत.तसेच शासनाने कामगारांचा सन्मान करावा.असे प्रतिपादन ऑल इंडिया म्युनसिपल वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष कॉ. उदय भट यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील नगरपालिका कंत्राटी कामगारांची ‘सन्मान परिषद’ वागदे येथील गोपूरी आश्रम येथे कॉ. अतुल दिघे यांचा अध्यक्षतेखाली रविवारी झाली. यावेळी ते बोलत होते.
सकाळी ११ वाजता कणकवली बस स्थानकाजवळील बौद्धविहार येथे जमून कामगारांनी बुद्धवंदना केली.तसेच बुद्धांच्या प्रतिमेला कॉ.शांताराम पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला कॉ. धोंडीबा कुंभार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला स्वागताध्यक्ष पल्लव कदम, बाबू बरागडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तेथून कामगारांची सन्मान रॅली बसस्थानकासमोरील रस्त्याने निघाली. ‘कंत्राटी कामगाराना सन्मान मिळालाच पाहीजे, किमान वेतन मिळालेच पाहीजे, कंत्राटी कामगाराना कायम करा, ई. एस. आय. चा लाभ मिळालाच पाहीजे, कामगारांचा पगार महिण्याच्या ५ तारखेच्या आत झालाच पाहीजे, नगरपालिकेतील रिक्त पदांची भरती करा. अशा घोषणा देत रॅली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांजवळ आली. त्याठीकाणी ऑल इंडिया म्युनसिपल वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष व पूणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) चे अध्यक्ष कॉ. उदय भट
व कार्याध्यक्ष कॉ. नरसिंगे यांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
त्यानंतर गोपूरी आश्रमात रॅली आली. त्यानंतर झालेल्या सन्मानपरिषदेत नगरपालिका कंत्राटी कामगारांना मार्गदर्शन करण्यात आले.तसेच विविध ठराव मंजूर करण्यात आले.
या परिषदेला जगन्नाथ केळूसकर, प्रवीण यादव, भूषण यादव,स्नेहा कदम, दशमी लाड, सचिन कदम, शिवराम जाधव, ऋत्वेश माडगुळ यांच्यासह जिल्हयातील बहुसंख्य कंत्राटी कामगार बंधू भगिनी उपस्थित होत्या.