सुशांत नाईक यांचे जवळचे निष्ठावान कार्यकर्ते भाजपात
मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश
कणकवली : मत्सोद्योगमंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा कणकवली शहरात उबाठा सेनेला दणका दिला असून ठाकरे सेनेचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख शिलेदारांनी ओम गणेश निवासस्थानी आज मंत्री नितेश राणेंच्या हस्ते भाजपात प्रवेश केला. माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश झाला असून नगरपंचायत निवडणूक जाहीर होण्याआधीच कणकवली शहरात उबाठा सेनेला नव्याने गळती लागली आहे. अमोल रासम, किरण मालपेकर,सिद्धेश सावंत,वैभव सावंत, गणेश देवळेकर, निशांत लाड, मनोहर लाड, रोहीत लाड, उत्तम पुजारे ,चेतन पुजारे,वैभव निकम आदी शिवसैनिकांनी भाजपात प्रवेश केला.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी नगरसेवक मेघा गांगण, बंडू गांगण आदी उपस्थित होते.